नाशिक शहरात ध्वनीसह जलप्रदूषणात वाढ

महापालिकेचे उपाययोजनेकडे दुर्लक्ष
Water and noise pollution
Water and noise pollutionsakal
Updated on

नाशिक : वाढत्या शहर विस्तारात मेट्रोकडे वाटचाल करीत असल्याचा छातीठोक दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात समस्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यातीलच दोन महत्त्वाच्या समस्या म्हणजे जल व ध्वनी प्रदूषणाकडे (Water and noise pollution) महापालिकेच्या पर्यावरण अहवालाने लक्ष वेधले असून, मोठ्या प्रमाणात दोन्ही प्रकारच्या प्रदूषणात वाढ झाल्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे शहर विकासावर सात- आठ तास महासभेत चर्चा होत असताना, विकासामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर चर्चा होण्याऐवजी विना चर्चा अहवाल जशाच्या तसा मंजूर करून उपाययोजना दुर्लक्षिल्याची बाब समोर आली आहे.

Water and noise pollution
ओमिक्रॉनपासून आशियायी देश सध्या सुरक्षित

महापालिकेतर्फे महासभेला नोव्हेंबर महिन्यात पर्यावरण अहवाल सादर करण्यात आला. त्यात आयटीआय सिग्नल, सातपूर व अंबड औद्योगिक वसाहत, मुंबई नाका, मेन रोड, जुने सीबीएस, द्वारका व पंचवटी कारंजा या भागात धुलीकण, सल्फरडाय ऑक्सॉईड, नायट्रोजन डायॉक्साईड व कार्बन मोनाक्साईड मर्यादित स्वरूपात आढळले. मात्र, गोदावरी, दारणा, नंदिनी व कपिला या चार नद्यांमध्ये पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजन (बीओडी) दहापेक्षा जास्त आढळला. गोदावरी नदीपात्रात तपोवनात २४, नंदिनी नदीत आयटीआय पुलाजवळ ३१, सिटी सेंटर मॉलजवळील पात्रात ४०, नासर्डी पूल येथील समाजकल्याण विभागाच्या कार्यालयाजवळ २१ प्रमाण आढळले. वाघाडी नदीत म्हसरूळ भागात ४८, गणेशवाडी दवाखान्यासमोर ११ इतके प्रमाण आढळले, तर वालदेवी नदीत विहितगावजवळील पाण्याच्या नमुन्यांमध्ये बीओडीचे प्रमाण १८ आढळून आले.

Water and noise pollution
नांदेड मारतळ्यात अवैध बायोडिझेलची विक्री

ध्वनिप्रदूषणात वाढ

आवाजाची मर्यादा दिवसा ५५, तर रात्री ४५ डेसिबल आहे. मात्र, मुंबई नाका, जुने सीबीएस, मेन रोड, पंचवटी कारंजा, आयटीआय सिग्नल त्र्यंबक रोड, द्वारका या भागात दिवसा ७०, तर रात्री ६५ डेसीबल अशी मर्यादा ओलांडली आहे. सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत मात्र ध्वनी मर्यादेत असल्याचे आढळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.