पंचवटी : नाशिक महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करीत शहर बससेवा सुरू केली. सिटीलिंक ठेकेदार कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन करीत नसल्याने दर सहा महिन्यात कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे. आता पुन्हा गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे गुरूवारी (ता.२९) सिटीलिंक कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. (Nashik City Link Bus Service Stopped Again )
यामुळे तपोवन बस डेपोतून पहाटे पासून एकही बस बाहेर निघाली नाही. या संपावर काही तोडगा न निघाल्यास प्रवाशांना दिवसभर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल.
नाशिक महानगरपालिकेने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेली महापालिकेची बससेवा सुरू केली. ठेकेदार मार्फत सुरू असलेली सिटीलिंक बस सेवा गुरूवारी (ता.२९) ठप्प झाली. गेल्या दोन महिन्यांपासून सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांना ठेकेदाराने वेतन दिले नसल्यामुळे पुन्हा एकदा काम बंद आंदोलन पुकारले आहे.(latest marathi news)
पहाटेपासून तपोवन डेपोतुन एकही बस बाहेर पडली नाही. या आंदोलनात जवळपास १५० पेक्षा कर्मचारी सहभागी झाले आहेत. दोन महिन्यांपासून थकलेले वेतन यासह काही मुद्द्यांवर कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले असून, या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यावर हे कर्मचारी ठाम आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून वेतनवाढ झालेली नाही. गेल्या दोन वर्षे कोणत्याही प्रकारचा बोनस देण्यात आलेला नाही. यासह कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह खात्यात निधी देखील भरलेला नाही. सिटीलिंक प्रशासन व ठेकेदार संगनमताने कर्मचारी वर्गाची दिशाभूल करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.