Nashik water Supply : शहराला हवय 6200 दशलक्ष घनफूट पाणी! महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नोंदविली अतिरिक्त मागणी

Latest Nashik News : मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने मराठवाड्यासाठी नाशिक व नगरच्या गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून ८.६ टीएमसी पाणी सोडण्यात आले.
Gangapur Dam File Photo
Gangapur Dam File Photoesakal
Updated on

Nashik water Supply : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तब्बल ६ हजार २०० दशलक्ष घनफुट पाण्याची मागणी नोंदविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय कडून जलसंपदा विभागाला प्रस्ताव जाईल. त्यानंतर पाणी आरक्षणाच्या बैठकीमध्ये शहरासाठी किती पाणी आरक्षित ठेवायचे यावर अंतिम निर्णय होईल. (Nashik city needs 6200 million cubic feet of water)

मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने मराठवाड्यासाठी नाशिक व नगरच्या गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून ८.६ टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नाशिककरांवर पाणीटंचाईचे सावट होते. शहरासाठी ६१०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी असताना जलसंपदा विभागाने ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले. जवळपास ७८६ दशलक्ष घनफूट पाण्याची कपात केल्याने १९ दिवसांची आणि तूट महापालिकेला सहन करावी लागली. मात्र, प्रत्यक्षात आरक्षित पाण्यापेक्षा अधिक पाण्याचा वापर शहरात झाला.

१५ ऑक्टोबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ असे २९१ दिवसांसाठी ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले होते. त्यात गंगापूर धरण समूहातून ३८०७ तर दारणा व मुकणे धरणातून एकूण १५०७ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात गंगापूर धरणातून ४०३० तर दारणा धरणातून २२६ व मुकणे धरणातून १४११ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर आतापर्यंत झाला.

एकूण ५६६८ दशलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी वापरण्यात आले आहे. भविष्यात देखील पाण्याची तहान वाढणार आहे. नाशिक शहराची लोकसंख्या २२ लाखांच्यावर गेली आहे. त्यामुळे शहरासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असून त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जलसंपदा विभागाकडे ६१०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (latest marathi news)

Gangapur Dam File Photo
U19 IND vs AUS Cricket Match: साहिलच्‍या घणाघाती नाबाद 109 धावा! भारताकडून खेळताना 19 वर्षाआतील गटात ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध कामगिरी

परंतू, प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक पाणी लागणार असल्याने शंभरने वाढ करून ६२०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत पाणी वाटपाचा अंतिम निर्णय होईल.

आचारसंहितेचा अडसर

१५ ऑक्टोबर ते ३१ जुलै या २९० दिवसांसाठी पाण्याचे आरक्षण निश्‍चित केले जाते. पावसाळ्याच्या कालावधीतील पाण्याचा हिशोब ग्राह्य धरला जात नाही. १५ ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकारात पाणी आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

१५ ऑक्टोबर अशी आहे पाण्याची मागणी (दलघफू)

धरण आरक्षण

गंगापूर ४५००

दारणा २००

मुकणे १५००

-----------------------------

एकूण ६२००

Gangapur Dam File Photo
Voter Registration Malegaon Pattern: मतदार नोंदणीचा ‘मालेगाव पॅटर्न’! मालेगाव मध्यमध्ये साडेतीन महिन्यांत 37 हजार मतदारांची वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.