नाशिक : शहरातील बालगुन्हेगारी चिंताजनक बाब होती. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Nashik Police Commissioner) यांनी या विधीसंघर्षित बालकांचे पुर्नवसन करण्यासाठी विशेष संकल्पना राबविणे हाती घेतले आहे. या संकल्पनेमुळे विधीसंघर्षित बालकांना गुन्हेगारीच्या जगतातून बाहेर काढून त्यांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणणे शक्य होणार आहे.
त्यासाठी एनजीओ, बाल न्यायमंडळ आणि उद्योजक यांच्या मदतीने व समुपदेशनामुळे या बालविधीसंघर्षित बालकांना शिक्षण, रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. (Nashik city police step for rehabilitation of children in legal conflict marathi news)
शहरातील वाढत्या बालगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेनुसार शहर पोलीसांनी सकारात्मक पावले टाकत, या बालगुन्हेगारांच्या पूर्नवसनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पोलिसांच्या या प्रयत्नांना शहरातील उद्योजक, एनजीओ आणि बाल न्यायमंडळाचीही मदत मिळाली आहे.
तर, या विधीसंघर्षित बालकांसह त्यांच्या कुटूंबियांच्या सतत संपर्कासाठी एका पोलीस अंमलदाराची पालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस ठाणेनिहाय विधीसंघर्षित बालकांवरील गुन्ह्यांची माहिती संकलित करून त्यांचे वास्तव्य, त्यांचे शिक्षण, कुटूंबियांची माहिती संकलित करण्यात येत आहे.
या विधीसंघर्षित बालकांच्या सतत संपर्कात राहण्यासाठी पालक म्हणून एका पोलीस अंमलदाराचीही नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. पालक अंमलदार सतत या विधीसंघर्षित बालकांच्या संपर्कात राहील. समुपदेशनाने त्याच्या वर्तनात होणारे बदल आणि कुटूंबियांच्या माध्यमातून त्यांच्या सहभागी राहणार आहे. (Latest Marathi News)
तज्ज्ञ करणार समुपदेशन
मानसशास्त्राच्या प्राध्यापक डॉ. मृणाल भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली समुपेदशन डॉ. मुकुल चौधरी तर, बाल न्याय मंडळाच्या समन्वयक श्रीमती शोभा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणिता तपकिरे, तन्वीर मन्सुरी हे पंचवटी, आडगाव, म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विधीसंघर्षिक बालकांचे समन्वय साधतील.
अशारितीने मुंबई नाका, गंगापूर, सरकारवाडा, भद्रकालीच्या हद्दीतील विधीसंघर्षित बालकांचे समुपदेशन पूर्वा शिंदे तर, समन्वय गणेश कानवडे, विजय माळी करतील. देवळाली कॅम्प, उपनगर, नाशिकरोड हद्दीत समुपदेशन गौरव पगारे तर, समन्वय शोभा पवार, विजय माळी करतील. इंदिरानगर, अंबड, सातपूर, चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत समुपदेशन तन्मय जोशी, तर ज्योती पठारे, तन्वीर मन्सुरी हे समन्वय साधणार आहेत.
"विधीसंघर्षित बालकांचा गुन्हेगारांकडून वापर केला जातो. सोशल मीडियावरील रिल्समुळे भाईगिरीचे आकर्षण, गुन्हेगारांचे अनुकरणामुळे ते गुन्हेगारीकडे वळतात. योग्यवेळी त्यांना जाणीव करून दिली तर ते समाजाच्या मुख्यप्रवाहात येऊन गुन्हेगारीपासून परावृत्त होऊ शकतात. त्यासाठीच ही संकल्पना असून, पोलीस, बाल न्यायमंडळ, एनजीओ, उद्योजकांच्या समन्वयातून व प्रयत्नातून विधीसंघर्षित बालकांना परावृत्त करणे शक्य होऊ शकेल."
- संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.