Nashik City Transport : परिवहन महामंडळाला हवे 6 टक्के अधिक दर; मनपाकडून भाडे भरण्यास नकार

City Transport : राज्य परिवहन महामंडळाने नाशिक महापालिकेचे सेवा हस्तांतरित केल्यानंतर निमाणी, भगूर व नाशिक रोड हे बस डेपो महापालिकेला चालविण्यास दिले.

state Transport Corporation
state Transport Corporation esakal
Updated on

Nashik city Transport : राज्य परिवहन महामंडळाने नाशिक महापालिकेचे सेवा हस्तांतरित केल्यानंतर निमाणी, भगूर व नाशिक रोड हे बस डेपो महापालिकेला चालविण्यास दिले. परंतु रेडीरेकनर दरापेक्षा सहा टक्के अधिक दर महामंडळाला हवी आहे. बससेवा तोट्यात असल्याने महापालिका एवढ्या मोठ्या प्रमाणात भाडे भरण्यास तयार नाही. परिणामी निमाणीसह भगूर व नाशिक रोड या तीनही डेपोची दुरवस्था झाली असून प्रवाशांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (Nashik City Transport Corporation wants 6 percent more fare )

राज्य परिवहन महामंडळातून नाशिक महापालिकेने जुलै २०२१ मध्ये बससेवा हस्तांतरित केली. बससेवा हस्तांतरित झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या मिळकती महापालिकेकडे आल्या. परंतु त्याची मालकी मात्र परिवहन महामंडळाकडेच कायम आहे. महापालिका वापरत असलेल्या परिवहन महामंडळाच्या मिळकतींना भाडे देणे बंधनकारक आहे. त्यानुसार निमाणी, भगूर व नाशिक रोड यातील बसस्थानकाचे भाडे महापालिकेला देणे आहे.

निमाणी बसस्थानकाचा शंभर टक्के वापर होतो. तर नाशिक रोड व भगूर बसस्थानकाचा महापालिकेसह राज्य परिवहन महामंडळाकडूनदेखील वापर होतो. नाशिक रोड व भगूर बस स्थानकांमध्ये दुरुस्ती महामंडळाकडून केली जात आहे. निमाणी बसस्थानकातील दुरुस्तीला मात्र कराराचा अडथळा येत आहे.(latest marathi news)


state Transport Corporation
Sand Transport News : वाळू चोरीमध्ये जप्त केलेल्या डंपर, ट्रॅक्टरमालकांचा शोध सुरू; तहसीलदार पाटील

परिवहन महामंडळाकडे धाव

महापालिकेने निमाणी बसस्थानकाचा प्रतिमा दहा लाख याप्रमाणे वार्षिक एक कोटी २० लाख रुपये, तर भगूर व नाशिक रोड मिळून वार्षिक ५० लाख रुपये भाडे द्यावे, अशी मागणी राज्य परिवहन महामंडळाने केली आहे. परंतु महापालिकेने एवढ्या मोठ्या प्रमाणात भाडे देण्यास नकार दिला आहे.

महापालिकेची बससेवा सुरवातीपासून तोट्यात असल्याने जागा मोफत किंवा रेडीरेकनरच्या ०.५ टक्के दराने भाडे आकारणी करावी अशी मागणी केली आहे. परंतु राज्य परिवहन महामंडळातून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी राज्य परिवहन महामंडळाच्या आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला आहे. तांत्रिक मुद्द्यांमुळे बसस्थानकांची दुरुस्ती रखडली आहे.


state Transport Corporation
Nashik City Transport : बेशिस्त अन्‌ फ्रन्टसीट रिक्षाचालकांविरोधात कारवाई कधी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.