Nashik Citylinc Bus Strike : तोडगा न निघाल्याने बस डेपोतच; सिटीलिंक करणार वाहक ठेकेदार कंपनीवर दंडात्मक कारवाई?

Citylinc
Citylincesakal
Updated on

Nashik Citylinc Bus : वेतन मिळत नसल्याने वाहकांनी पुकारलेला संप रात्री उशिरापर्यंत मिटल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असले तरी मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी (ता. ५) एकही बस रस्त्यावर धावली नाही.

वाहक ठेकेदार कंपनीने १८ ऑगस्टपर्यंत थकीत वेतन देण्याचे कबूल केले, मात्र संघटनांनी नकार दिल्याने संप कायम राहिला. (Nashik Citylinc Bus Strike Citylinc will take punitive action against carrier contractor company news)

रविवारी (ता. ६) देखील बस सुरू होणार की नाही, याबाबत सिटीलिंक कंपनीचे अधिकारीच संभ्रमात आहे. वाहक ठेकेदार कंपनीवर कारवाई करण्यासाठी सिटीलिंक कंपनीने एकमेव दंडात्मक कारवाईचे हत्यार उपसले आहे.

वाहकांना वेळेत वेतन मिळत नसल्याने ४ ऑगस्टपासून सिटीलिंक कंपनीच्या अडीचशे वाहनांवरील वाहकांनी संप सुरू केला आहे. जुलै महिन्यातदेखील अशाचप्रकारे संप करण्यात आला होता, मात्र एप्रिल महिन्याचे वेतन देण्याचे कबूल केल्यानंतर वाहकांनी दोन दिवसांनी संप मागे घेतला. परंतु, वेतन न मिळाल्याने ४ ऑगस्टपासून पुन्हा संपाचे हत्यार उपसले आहे. नाशिक रोड, पंचवटी व तपोवन येथील डेपोतून एकही बस गेल्या दोन दिवसापासून बाहेर पडली नाही.

शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत सिटीलिंक कंपनीचे अधिकारी व ठेकेदारांमध्ये तोडगा काढण्याचे काम सुरू होते. मात्र, ठेकेदाराकडून १ कोटी ७० लाख रुपयांची दंडात्मक रक्कम कमी करावी, अशी मागणी करण्यात आली. सदर मागणी मान्य झाली नाही. तर दुसरीकडे १८ ऑगस्टपर्यंत वाहकाचे वेतन करण्याचे आश्वासन ठेकेदार मॅक्स कंपनीकडून देण्यात आल्यानंतरही वाहकांनी संपाची भूमिका कायम ठेवली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Citylinc
Nashik Cyber Crime: वर्क फ्रॉम होमच्या नादात एकाने गमावले 9 लाख; सायबर भामट्याने घातला शेतकरऱ्याला गंडा

रविवारीदेखील बस रस्त्यावर धावतील की नाही, याबाबत साशंकता आहे. दरम्यान, ठेकेदाराकडून वाहक संघटनेला संप मागे घेण्याचे विनंती केली जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु, संपावर ठाम असल्याची भूमिका वाहक संघटनेने घेतली आहे. त्यामुळे नाशिककरांना पुन्हा मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

बससेवा सुरू झाल्यापासूनचा हा पाचवा संप आहे. बससेवा सुरू न झाल्यास ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सिटीलिंक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी सांगितले.

नवीन वाहक ठेकेदार नियुक्त करणार

वारंवार होणाऱ्या संपामुळे सिटीलिंक व्यवस्थापनाने १०० बससाठी नवीन कंपनी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागपूरस्थित युनिटी मॅन पॉवर या कंपनीला नाशिक रोड डेपोतील बससाठी वाहक पुरविण्याचे काम दिले जाणार आहे. वारंवार संपामुळे बस सेवा बंद पडणे महापालिकेला परवडणारे नाही.

Citylinc
Sinnar Toll Naka Case: मनसे शहराध्यक्ष दातीर यांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला

नियमित दिवसाला व वेळेस बस रस्त्यावर न धावल्यास ठेकेदाराला एका बसमागे सहा हजार रुपयांचा दंड आहे. मात्र, दंडात्मक कार्यवाही ही बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी आहे. मात्र, वारंवार संप होत असल्याने बससेवा विस्कळित होत आहे.

त्यामुळे ठेकेदारच बदलण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात सिटीलिंक कंपनीच्या व्यवस्थापनाची पुढील आठवड्यात बैठक होऊन त्यात पर्यायी ठेकेदाराची नियुक्ती केली जाणार असल्याचे समजते.

Citylinc
Nashik Citylinc Strike: वेतन थकल्याने वाहकांचा पुन्हा संप; उद्यापासून बस धावणार!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.