Nashik Citylinc Bus : वेतनवाढ मिळाल्याने सिटीलिंक बस चालकांचा संप मागे; आजपासून सेवा सुरळीत

Citylinc Bus : गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या सिटी बसचा संप सोमवारी (ता.२९) मागे घेण्यात आला आहे.
Officials, staff while starting the bus service after celebrating after accepting the demands of City Link employees.
Officials, staff while starting the bus service after celebrating after accepting the demands of City Link employees.esakal
Updated on

Nashik Citylinc Bus : सिटीलिंक कंपनीच्या ऑपरेटर्स कडून चालकांना पाच हजार रुपयांची त्रैवार्षिक वेतन वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचबरोबर प्रति किलोमीटर इन्सेंटिव्ह व ओव्हरटाइमचा मेहनतानाही वाढविण्यात आल्याने गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या सिटी बसचा संप सोमवारी (ता.२९) मागे घेण्यात आला आहे. संपाच्या माध्यमातून यशस्वी तोडगा निघाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठे यश मिळाले. (Citylink bus drivers strike called off due to pay hike )

सिटीलिंक बस कंपनीकडे असलेल्या ५०० चालकांच्या वेतनात वाढ करावी व त्याचबरोबर अन्य प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या यासाठी सिटीलिंक बस चालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली संप पुकारला. शनिवारी (ता. २७) सकाळपासून सुरू झालेल्या या संपामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. तर खासगी प्रवासी वाहतूकदारांनी मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांना संपाची झळ बसली.

सिटीलिंक कंपनीच्या विरोधात पुकारण्यात आलेला हा अकरावा संप होता. मूळ वेतनामध्ये बारा हजार रुपये वाढ करावी, प्रोत्साहन भत्ता वाढवून मिळावा, प्रति किलोमीटर दोन रुपये प्रोत्साहन भत्ता मिळावा तपोवन डेपो व नाशिक रोड डेपोतील बस चालकांचे मूळ वेतन समान करावे या मागण्या आंदोलकांच्या होत्या. मनसेच्या कामगार सेनेचे नेते अंकुश पवार व ऑपरेटर्स कंपन्यांच्या प्रतिनिधी समवेत सिटी लिंक प्रशासनाने सोमवारी चर्चा केली.

यात चालकांना यावर्षी दीड हजार तर पुढील वर्षी दीड हजार व तिसऱ्या वर्षी दोन हजार रुपयांची वेतन वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे चालकांनी संप मागे घेतला. त्यामुळे दुपारी साडेचार वाजे नंतर तपोवन डेपोतून ६० तर नाशिक रोड डेपोतून ४५ बसेस सोडण्यात आल्या. मंगळवारपासून (ता. २९) नियमित सेवा सुरू होईल. अशी माहिती सिटीलिंक कंपनीचे महाव्यवस्थापक (संचलन) मिलिंद बंड यांनी दिली. (latest marathi news)

Officials, staff while starting the bus service after celebrating after accepting the demands of City Link employees.
Nashik Citylinc Bus : वाहक पुरवठा करणाऱ्या कंपनीला काळ्या यादी टाकण्याची तयारी

अन्य लाभही मिळणार

वेतन वाढीबरोबरच चालकांना दिला जाणारा ६८ पैसे प्रतिकिलो मीटर इन्सेंटिव्ह ९० पैसे प्रतिकिलो मीटर करण्यात आला. चालकांना नियमानुसार रजा दिल्या जाणार आहे. सलग दोन ड्यूटी केल्यास एका ड्युटीचा अतिरिक्त पगार देखील देण्याचे मान्य करण्यात आले.

७० लाखांचा तोटा वसूल करणार

या संपामुळे सिटी लिंक कंपनीला शनिवार, रविवार असे अनुक्रमे अडीच हजार फेऱ्या रद्द कराव्या लागल्या तर सोमवारी दोन हजार फेऱ्या रद्द झाल्या. यातून कंपनीला सत्तर लाख रुपयांचा तोटा झाला आहे. करारानुसार सिटीलिंक कंपनी ऑपरेटर्स कडून तोटा वसूल करणार असल्याची माहिती कंपनीच्या महाव्यवस्थापक बंड यांनी दिली.

मनसेच्या आंदोलनाला यश

एकेकाळी नाशिक एकेकाळी नाशिक महापालिका क्षेत्रात मनसेची मोठी ताकद होती. मात्र, कालांतराने ही ताकद क्षीण होत गेली. मागील दोन अडीच वर्षात पक्षाकडून जोरदार असे आंदोलन देखील झाले नाही. पक्षाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर बसणारे लोक एवढेच पक्षाचे स्वरूप मर्यादित राहिले. परंतु पाचशे चालकांना वेतन वाढ मिळवून देण्यात मनसे कामगार सेनेला यश आले.

''बस चालकांना अगदी कमी वेतन होते. मात्र तरी जोखीम पत्करून सेवा दिली जात होती सिटीलिंक कंपनी प्रशासनाकडून आश्वासन दिले होते ते पूर्ण झाले नाही व नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आंदोलन हाती घ्यावे लागले. यात मनसे कामगार सेनेला यश आले आहे.''-अंकुश पवार, नेते, मनसे कामगार सेना.

Officials, staff while starting the bus service after celebrating after accepting the demands of City Link employees.
Nashik Citylinc Bus : सिटीलिंक बससेवा आजपासून सुरळीत; वाहकांच्या संपावर अखेर तोडगा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.