Nashik Citylinc Bus : वाहक पुरवठा करणाऱ्या कंपनीला काळ्या यादी टाकण्याची तयारी

Citylinc Bus : सिटीलिंक बस सेवेला वाहकांचा पुरवठा करणाऱ्या दिल्ली येथील मॅक्स डिटेक्टिव्ह ॲन्ड सिक्युरिटी कंपनीला मुदत संपण्याआधीच बाजूला टाकत वाहक पुरवठादार नवीन कंपनी नियुक्त करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Citylinc Bus
Citylinc Busesakal
Updated on

Nashik Citylinc Bus : सिटीलिंक बस सेवेला वाहकांचा पुरवठा करणाऱ्या दिल्ली येथील मॅक्स डिटेक्टिव्ह ॲन्ड सिक्युरिटी कंपनीला मुदत संपण्याआधीच बाजूला टाकत वाहक पुरवठादार नवीन कंपनी नियुक्त करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर संबंधित ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची तयारी सिटीलिंक कंपनीकडून करण्यात आली आहे. (Nashik Citylink Bus marathi news)

महापालिकेकडून सिटीलिंक बससेवा चालवली जाते. अडीचशे बस शहरासह ग्रामीण भागात धावतात. ग्रॉस कॉट कटिंग या तत्त्वावर बस चालविताना वाहक व चालक पुरवठादारदेखील आऊटसोर्सिंगने भरण्यात आले आहे. अडीच वर्षांपूर्वी बससेवा सुरू झाल्यानंतर मॅच डिटेक्टिव्ह ॲन्ड सिक्युरिटी या वाहक पुरवठा कंपनीला काम देण्यात आले. (Latest Marathi News)

Citylinc Bus
Nashik Citylinc Bus : सिटीलिंक वाहकांचा संप अखेर मागे; जानेवारीचे वेतन जमा

परंतु कंपनीच्या अनियमित कामामुळे तब्बल आठ वेळा संपाला सामोरे जावे लागले. नियमित वेतन न मिळणे, अपुरे वेतन देणे ग्रॅच्युएटी व भविष्यनिर्वाह निधीची रक्कम अदा न करणे, दिवाळी बोनस न देणे, कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे यामुळे कर्मचाऱ्यांनी अनेकदा संप पुकारला.

सिटीलिंक कंपनीने आगाऊ वेतन अदा करूनही संप पुकारला जात असल्याने महापालिका प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावण्याबरोबरच तीनदा टर्मिनेशन नोटीस बजावली. मागील आठवड्यात अशाच प्रकारे संप करण्यात आला होता. ठेकेदाराला समज दिल्यानंतर सेवा पूर्ववत झाली. संबंधित ठेकेदाराची मुदत जुलै महिन्यात संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर कामाची नवीन निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Citylinc Bus
Nashik Citylinc Bus Service: सिटीलिंक बससेवा बंद करण्याचा इशारा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.