Nashik Citylinc Protest: सिटीलिंक बससेवा पुन्हा ठप्प! 2 वर्षात सातवा संप

Nashik Citylink employees on protest news
Nashik Citylink employees on protest newsesakal
Updated on

Nashik Citylinc Protest: : किलोमीटर मागे जवळपास ४० ते ४५ रुपयांचा तोटा सहन करणाऱ्या सिटीलिंक कंपनीला वाहकाच्या दोन वर्षातील सातव्या संपाला बुधवारी (ता.२२) सामोरे जावे लागले. त्यामुळे चाकरमान्यांना पुन्हा एकदा मनस्ताप सहन करावा लागला. सेवा बंद तरी करा, असा तिखट सवाल प्रवाशांनी व्यक्त केला. किमान वेतनातील फरक, बोनस व वेतन न मिळाल्याने संपाचे हत्यार उपसण्यात आले.

महापालिकेकडून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी बससेवा चालविली जाते. बससेवा चालविण्यासाठी सिटीलिंक कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. (Nashik Citylink employees on protest news)

कंपनीच्या माध्यमातून ग्रॉस कॉस्ट कटिंग तत्त्वावर पहिल्या टप्प्यात २५० बस चालविल्या जात आहेत. बस ऑपरेटरला किलोमीटर मागे जवळपास ८५ रुपये दिले जातात. त्याव्यतिरिक्त महापालिकेला खर्च नाही. संपूर्णपणे आउटसोर्सिंगचे मॉडेल असलेल्या सेवेत चालक व वाहक पुरविण्याचे काम ‘मॅक्स डिटेक्टिव्ह अॅन्ड सिक्युरिटीज’ या दिल्ली स्थित कंपनीकडे आहे. नियमित वेतन न मिळणे, अपुरे वेतन, ग्रॅच्युएटी व भविष्यनिर्वाह निधी रक्कम अदा न करणे, दिवाळी बोनस, कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई अशा विविध कारणांमुळे कर्मचाऱ्यांनी सेवा सुरू झाल्यापासून सात वेळा संप पुकारला.

संपामुळे आतापर्यंत एक कोटी ४० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. वेळेत वेतन मिळत नसल्याने १८ व १९ जुलैला दोन दिवसांचा संप पुकारण्यात आला. ४ ऑगस्टला पुन्हा वाहकांनी संप पुकारला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वेतन अदा केले. बोनसही देण्याचे आश्वासन पाळले नाही. किमान वेतनातील फरक ठेकेदाराकडून मिळतं नसल्याने ४६० वाहक बुधवारी सकाळपासून संपावर गेले.

दोन हजार फेऱ्या रद्द

संपामुळे सिटीलिंक बसच्या तब्बल दोन हजार फेऱ्या रद्द करण्यात आल्या. सिटीलिंकला २२ लाखांचा तोटा आल्याने सिटीलिंककडून ठेकेदाराला पुन्हा एकदा दंडाची नोटीस बजावण्यात आली. संपामुळे प्रवाशांना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागला. आजपासून शाळा सुरू झाल्याने त्याचा संपाचा फटका विद्यार्थ्यांना बसला. शहरात सुरू असलेल्या शिवपुराण कथेसाठी बस उपलब्ध न झाल्याने गर्दी रोडावली.

Nashik Citylink employees on protest news
Nashik Citylinc Protest: सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा संप टळणार?

असे झाले संप

१ सप्टेंबर २०२२

६ डिसेंबर २०२२

६ एप्रिल २०२३

११ मे २०२३

१८ व १९ जुलै २०२३

४ ऑगस्ट २०२३

२२ नोव्हेंबर २०२३

दुसऱ्या ठेकेदारालाही नोटीस

संपाचे हत्यार कायम उपसले जात असल्याने स्पर्धा निर्माण करण्यासाठी नागपूरच्या युनिटी मॅनपॉवर कंपनीला नाशिक रोड डेपोसाठी शंभर बससाठी १६९ वाहक पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली. ऑगस्टमध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले. जेणेकरून संपूर्णपणे बससेवा बंद पडू नये परंतु या ठेकेदार कंपनीकडून महापालिकेला बँक गॅरंटी दिली जात नसल्याने नवीन ठेकेदार नियुक्तीचे काम रखडले आहे. आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी युनिटीच्या ठेकेदाराला तंबी देताना गुरुवार (ता. २३) दुपारपर्यंत बँक गॅरंटी भरण्याच्या सूचना दिल्या.

"मागील व चालु वर्षाचा बोनस न देणे, किमान वेतनातील फरक न दिल्याने वाहक संपावर गेले आहेत. वादावर तोडगा काढून बससेवा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत." - प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Nashik Citylink employees on protest news
Nashik Citylinc Protest: सिटलिंक कर्मचारी संपाच्या तयारीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()