नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात ८० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेले शवागारातील शीतपेट्या (बॉडी कॅबिनेट) निकृष्ट दर्जाच्या आहेत. त्यामुळे शवपेट्यातील मृतदेह लवकर कुजून त्याची दूर्गंधी पसरते आहे. तर दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने पोलीस आणि महापालिकेच्य आरोग्य विभागाकडून मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी असताना त्यांच्याकडून महिना-महिना मृतदेह शीतपेट्यात पडून राहत असून, त्यांची विल्हेवाट करण्यास विलंब केला जात असल्याचा आरोप केला आहे. (civil hospital body cabinets in mortuary are of poor quality )
या तु-तु, मै-मैतून मात्र अवघ्या काही महिन्यांपूर्वी लाखाेंचा खर्च करून उभारलेल्या शवागाराची झालेली दुरावस्था मात्र चर्चेत आली आहे. जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेतन विभागाशेजारीच शवागार उभारण्यात आलेले आहे. गेल्या काही वर्षांपासून शवागाराची समस्या प्रलंबित होती. अपुर्या शितपेट्यांमुळे उघड्यावर मृतदेह ठेवण्याचीही यापूर्वी वेळ आली होती. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ८० लाखांचा निधी उपलब्ध झाल्यानंतर ४८ शितपेट्यांचे शवागार उभारण्यात आले.
मुंबईस्थित ठेकेदाराकडून सदरील काम करून घेण्यात आल्याचे समजते. परंतु हे शवागार उभारत असताना ज्या शितपेट्या वापरण्यात आल्या आहेत, त्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचे बोलले जाते. अवघ्या दोनच महिन्यांमध्ये या शितपेट्यांची दुरावस्था झालेली आहे. बहुतांशी शितपेट्यां नादुरुस्त झालेल्या आहेत.
अनेक पेट्यांचे ‘कुलिंग’ होत नाहीत. त्यामुळे अशा पेट्यांमध्ये ठेवलेले मृतदेह लवकरच कुजण्यास (डिकंपोज) सुरूवात होऊन त्यातून दुर्गंधी पसरते आहे. तसेच शवागारातील अस्वच्छेतेमुळे याठिकाणी ‘आळ्या’ही पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात चौकशी करून संबंधित ठेकेदाराविरोधात कारवाई करण्याची मागणी होते आहे.
बेवारस मृतदेहांचे लागेना विल्हेवाट
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षामध्ये दररोज किमान २० मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाते. यातील बहुतांशी मृतदेह लगेचच नेले जातात. परंतु बेवारस, फिरस्ता, बेघर मयत व्यक्तींचे मृतदेह शवागारात ठेवले जातात. त्याची माहिती संबंधित पोलीस आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिली जाते.
परंतु या विभागांकडून निश्चित दिवसात पाठपुरावा होत नसल्याने हे मृतदेह बर्याचा महिना-महिना शवागारात असतात. परिणामी हे मृतदेह कुजण्यास सुरवात होऊन त्याची दूर्गंधी सुटते. शवविच्छेदन केल्यानंतर किमान तीन दिवसात मृतदेहावर अंत्यसंस्कार होणे अपेक्षित असते. परंतु या मृतदेहांची वेळेत विल्हेवाट लागत नसल्याचे जिल्हा रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.
दावा फेटाळला
शवागारातील शितपेट्यांमध्ये बहुतांशी मृतदेह हे बेवारस असतात. मूळात ते मृतदेह उशिराने आणले जातात. शवविच्छेदन होऊन ते शवागारात ठेवले जातात. या मृतदेहांची कुजण्याची प्रक्रिया (डिकंपोज) सुरू झालेली असते. त्यामुळे अशा मृतदेहांची दोन दिवसात विल्हेवाट लावणे अपेक्षित असते. तर, दुसरीकडे शवागारात वापरण्यात आलेल्या शितपेट्या या पॉझिटिव्ह कॅबिनेट प्रकारातील असतात. अशा शितपेट्यांमध्ये ठराविक दिवसांपर्यंत मृतदेह ठेवणे अपेक्षित असते. त्यानंतर त्यातील मृतदेहदेखील कुजण्यास प्रारंभ होते. त्यामुळे शितपेट्या निकृष्ट असल्याचा दावा जिल्हा रुग्णालयाने फेटाळून लावला आहे.
‘त्या’ आरोग्य कर्मचार्यांकडे अंगुलीनिर्देश
घात-अपघात, नैसर्गिक मृत्यु झालेल्यांचे शवविच्छेदनानंतर नातलग मृतदेह घेऊन जातात. रेल्वे कटिंग, बेवारस मृतदेह शवागारात ठेवले जातात. ग्रामीण व शहर पोलिसांकडून अशा मृतदेहाच्या नातलगांचा शोध घेतला जातो. तो मिळून न आल्यास तसा अहवाल महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्याकडे दिला जातो.
हा कर्मचारी सिव्हिलच्या शवागार कक्षाकडे उपस्थित राहत नाही. पोलिस त्याच्याशी संपर्क साधतात त्यावेळी तो उडवाउडवीची उत्तरे देतो. तसेच, बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी त्याच्यावर असताना तो महिना-महिना या मृतदेहांची विल्हेवाट लावत नसल्याची तक्रार रुग्णालय प्रशासन व पोलीसांनी केली आहे.
सद्यस्थितीत...
शवागारातील शितपेट्या : ४८
शितपेट्यातील मृतदेह : १३
मृतदेहांचे विवरण : रेल्वे कटिंग : १, बेवारस : १२
''शवागारातील शितपेट्या निकृष्ट असल्याचा दावा फोल आहे. मूळातच मृतदेह ठराविक कालावधीनंतर कुजण्यास सुरुवात होत असते, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यांची विल्हेवाट वेळेत होत नसल्याचे समस्या उद्भवते. ती जबाबदारी ज्या विभागांवर आहे, त्यांनी ती पाठपुरावा करून वेळेत पार पाडली तर असा प्रश्न उद्भवणार नाही.''- डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.