Nashik Civil Hospital : पंचनामा न होताच मृतदेह रात्रभर शवविच्छेदन कक्षाबाहेर! ‘सिव्हिल’चा भोंगळ कारभार पुन्हा उघड

Nashik News : जिल्हा रुग्णालयातील आणखी एक भोंगळ कारभार उघडकीस आला असून, मृतदेहाचा पंचनामा न करताच त्यावर बिल्ला लावून तो मृतदेह शवविच्छेदन कक्षाकडे पाठविण्यात आला.
Nashik Civil Hospital
Nashik Civil Hospitalesakal
Updated on

Nashik News : जिल्हा रुग्णालयातील आणखी एक भोंगळ कारभार उघडकीस आला असून, मृतदेहाचा पंचनामा न करताच त्यावर बिल्ला लावून तो मृतदेह शवविच्छेदन कक्षाकडे पाठविण्यात आला. प्रत्यक्षात रात्री शवविच्छेदन कक्ष बंद असतो हे ठाऊक असतानाही असा निष्ठुरपणा समोर आला आहे. (Civil Hospital dead body outside autopsy room overnight without Panchnama)

रात्री मृतदेहाची मुक्या जनावरांकडून काही हेळसांड झाली असती तर त्यास जबाबदार कोण? त्याहीपेक्षा सदर मृतदेह अपघाताच्या घटनेशी निगडित असल्याने त्याचा पंचनामा न करताच मृतदेह शवविच्छेदन कक्षाकडे पाठविणे म्हणजे, एकप्रकारे ‘पुराव्या’शी खेळण्याचाच प्रकार असल्याने त्यावर पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. गेल्या चार-पाच दिवसातील अशी घटना दुसऱ्यांदा घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जव्हार (पालघर) येथे अपघातग्रस्त व्यक्तीला सोमवारी (ता. ८) मध्यरात्री जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले असता, मंगळवारी (ता. ९) पहाटे सव्वा-दीडच्या सुमारास रुग्णाला निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याने मयत घोषित केले. त्यासंदर्भातील माहिती नातलगांना दिल्यानंतर प्रक्रियेनुसार, पोलिसांनी स्पॉट पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाते.

परंतु, सिव्हिलच्या कॅज्युलिटीतील कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचा पंचनाम्याची सोपस्काराला फाटा देत पहाटे दीडच्या सुमारास थेट शवविच्छेदन कक्षाबाहेर मृतदेह स्ट्रेचरवर ठेवून दिला. प्रत्यक्षात रात्री शवविच्छेदन कक्ष बंद असते. अशारीतीने मृतदेह कोणत्याही देखरेखीविना त्या ठिकाणी असल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. शवविच्छेदन विभागाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विचारणा केल्यानंतर घटनेची वाच्यता झाली. (latest marathi news)

Nashik Civil Hospital
Nashik Monsoon Delay : मालेगाव तालुक्यात पावसाची प्रतिक्षा; पावसाअभावी 24 टक्के पेरण्या खोळंबल्या

सिव्हिल चौकीतील पोलिसांकडे नोंद नसल्याने त्यांचीही धावपळ सुरू झाली. मृतदेहावर बिल्ला लावलेला, परंतु त्याचा कोणतेही कागदपत्र ना पोलिसांकडे, ना शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे. पंचनामा करणाऱ्या पोलिसांनी कॅज्युलिटीतील कर्मचाऱ्यांनी.

‘व्यक्ती मृत झाल्यावर काही मिनिटांत शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना असल्याचे’ त्यांना सांगण्यात आले. यावर मात्र पोलिसांनी जोरदार आक्षेप घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. मात्र त्यावरून सिव्हिल व पोलिस यांच्यात दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

पंचनामा महत्त्वाचाच

सिव्हिलमध्ये घात-अपघात, गंभीर जखमी, नैसर्गिकरित्या वा आजारपणाचे रुग्ण वा मृतदेह येतात. वैद्यकीय अधिकाऱ्याने मयत घोषित केल्यानंतर त्या मृतदेहाचा पोलिस पंचनामा केल्यानंतरच त्या मृतदेहाला बिल्ला चिकटविला जातो. परंतु या घटनेत या प्रक्रियेलाच फाटा देत कॅज्युलिटीत पंचनामा न होताच मृतदेहाला बिल्ला लावून शवविच्छेदन कक्षाकडे पाठविण्यात आले.

Nashik Civil Hospital
Nashik News: रस्त्यातील उघड्या गटारीत लाकडाचे ओंडके! सिन्नर-निफाड रस्त्यावर बारागाव पिंपरी येथील रेल्वे उड्डाण पुलाखालील प्रकार

ही बाब गंभीर असून अपघातग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना न कळविता, मृतदेह थेट शवागृहाबाहेर बेवारस स्थितीत ठेवणे गंभीर असून त्यावर पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. यामुळे पंचनाम्यातील नोंदी बदलून प्रकरण चुकीचे नोंद होऊ शकते, असेही पोलिसांनी अधोरेखित केले आहे.

यापूर्वीचीही असे घडले

गेल्या ५ तारखेला नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेला प्रसूती कळा आल्याने तिच्या पतीने रात्री पावणेदहाच्या सुमारास सिव्हिलमध्ये दाखल केले. मात्र सव्वा दहाच्या सुमारास तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पतीला तोंडीच सांगितले. त्यानंतर पतीकडून महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे संमतिपत्र लिहून घेण्यात आले आणि रात्री पावणेबाराच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेला अधिकृतरीत्या लेखी स्वरूपात मृत घोषित केले.

मात्र, त्यानंतरही अर्धा तासाने म्हणजे, ६ जुलैला मध्यरात्री १२.३५ वाजता वैद्यकीय तक्रारीची प्रत तयार केली गेली. ही प्रत रुग्णालयातील पोलिसांकडे पहाटे १.१५ वाजता पोचली. त्यानंतर पहाटेच पंचनामा करून सकाळी महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले.

Nashik Civil Hospital
Nashik Tourist Places : वर्षाविहार करताना मस्ती कराल तर याद राखा! पर्यटनस्थळे, धरणांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी

"सिव्हिलमध्ये उपचारादरम्यान वा येण्यापूर्वी मयत झालेल्या व्यक्तीचा पंचनामा केल्यानंतर त्याचे शवविच्छेदन होणे अपेक्षित आहे. कायदेशीर प्रक्रिया आहे, त्याचे पालन झाले पाहिजे. यासंदर्भात सखोल चौकशी करून सिव्हिल प्रशासनाला तसे पत्र देऊन सदरची बाब लक्षात आणून दिली जाईल." - किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक.

"कॅज्युलिटी विभागात मयत घोषित केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनाला पाठविण्याची प्रक्रिया करून पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. पोलिस रात्रीच्या वेळी पंचनामा करण्यासाठी उपस्थित असतीलच असे नाही. मात्र तोपर्यंत मृतदेह त्याचठिकाणी असतो. त्यामुळे पोलिसांनी शवविच्छेदन कक्षाकडे पंचनामा करता येऊ शकेल. यातून कामकाज सुरळीत व्हावे हाच हेतू आहे." - डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णाल

Nashik Civil Hospital
Nashik News : एकलहरे सरपंचांच्या विरोधातील विवादी अर्ज फेटाळला! शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.