Nashik Civil Hospital: औषध पुरवठादाराला केले ‘ब्लॅक लिस्ट’! जिल्हा शल्यचिकित्सकांचा दणका

गेल्या काही महिन्यांपासून नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयास स्थानिकस्तरावर औषध पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडून अनियमित औषध पुरवठा केला जातो आहे.
Civil Hospital Nashik
Civil Hospital Nashikesakal
Updated on

नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयास स्थानिकस्तरावर औषध पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडून अनियमित औषध पुरवठा केला जातो आहे.

याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही औषध पुरवठा होत नसल्याने, त्यावर ठपका ठेवत त्यास ब्लॅक लिस्ट करण्यात आले आहे.

तर, रुग्णालयास औषधांचा तुटवडा होऊ नये यासाठी नवीन वर्षापासून ‘जेम’कडून (गव्हर्नर इ-मार्केट प्लेस) औषध खरेदी केली जाणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या या निर्णयामुळे ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे. (Nashik Civil Hospital medicine supplier been blacklisted district hospital surgeon action)

सध्या राज्यभरातील जिल्हा रुग्णालयांना आरोग्य विभागाने नेमून दिलेल्या ठेकेदारांकडून औषध पुरवठा होत नाही. त्यामुळे बहुतांशी ठिकाणी औषधांचा तुटवडा आहे. परंतु त्यावर जिल्हा रुग्णालयांना स्थानिक पातळीवर औषध खरेदीस मान्यता दिली होती.

त्यानुसार, जिल्हा शल्यचिकित्सक त्यांच्या अधिकार कक्षेतून स्थानिक औषध पुरवठादारांकडून औषधांची खरेदी करीत आहेत.

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयासही एका औषध पुरवठादाराकडून गेल्या काही वर्षांपासून ४६ टक्के औषध पुरवठा केला जात होता. परंतु सध्या या पुरवठादाराकडून अनियमित औषधांचा पुरवठा होतो आहे.

त्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी जाब विचारला असता, औषध पुरवठादाराने त्याची थकीत रक्कम मिळत नसल्याने कारण सांगितले. या पुरवठादारास करारानुसार औषध पुरवठा थांबवता येत नसल्याची ताकीदही देण्यात आली.

त्यामुळे त्याने औषध पुरविले परंतु तेही अत्यल्प होते. त्यामुळे करारानुसार वारंवार पाठपुरावा करूनही औषध पुरवठादाराकडून औषधांची पूर्तता होत नसल्याने डॉ. शिंदे यांनी या पुरवठादारास ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये समाविष्ठ केले आहे.

डॉ. शिंदे यांच्या या निर्णयामुळे जिल्हा रुग्णालयात ठेक्याने कामे करणार्यांना सर्वच ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे.

Civil Hospital Nashik
Nashik News : पेपरफुटीचे रॅकेट, भ्रष्टाचारामुळे नाशिकची राज्‍यभर चर्चा..!

‘जेम’कडून करणार खरेदी

राज्य शासनाने आरोग्य विभागांतर्गत हाफकिन कंपनीला औषध पुरवठ्याचा ठेका दिलेला आहे. परंतु त्यांनीही थकबाकीचे कारण देत औषध पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर (लोकल) जिल्हा रुग्णालयांकडून औषध खरेदी केली जाते.

परंतु त्यातही अडचणी आल्याने जिल्हा रुग्णालय आता जेमकडून औषध खरेदी करणार आहे. जेम हे केंद्रशासनाअंतर्गत पोर्टल असून त्यावर जिल्हा शल्यचिकित्सक त्यांना पाहिजे असलेल्या औषधांची मागणी नोंदवून मागवू शकतात. यामुळे जिल्हा रुग्णालयात असलेला औषधांच्या टंचाईचा मुद्दा मार्गी लागणार आहे.

"औषध पुरवठादार ठेकेदारास औषधे पुरविणे बंधनकारक आहे. संबंधित ठेकेदाराने कराराचे उल्लंघन केल्याने त्यास ब्लॅकलिस्ट केले आहे. यापुढे जेमकडून औषध खरेदी केली जाईल."

- डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक

Civil Hospital Nashik
Nashik: आयुक्तांचे एक घाव..दोन टोले! आरोग्यवर्धिनीचे काम रखडले; अभियंते पाटोळे, शिंदे, जाधव यांना कारणे दाखवा नोटिसा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.