Nashik News : निफाड तालुक्यातील गावांमध्ये शुद्ध पाणीपुरवठा; फेब्रुवारी अखेर 133 जलस्रोतातील पाणी पिण्यायोग्य

Nashik : जल ही जीवन है... अशा शब्दांत पाण्याचे महत्त्व विशद केले जाते. पण हेच पाणी जर अशुद्ध असले तर ते जीवावर उठते.
Santhosh Khalkar, health worker taking OT test of drinking water.
Santhosh Khalkar, health worker taking OT test of drinking water.esakal
Updated on

Nashik News : जल ही जीवन है... अशा शब्दांत पाण्याचे महत्त्व विशद केले जाते. पण हेच पाणी जर अशुद्ध असले तर ते जीवावर उठते. त्यातून जीवेघेणे आजार पसरतात. हेच गांभीर्य निफाड तालुक्यातील ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ओळखले. त्यामुळे जलस्रोतचे वेळच्यावेळी शुद्धीकरण करून पिण्यायोग्य पाणी पुरवठा करण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करतात. (nashik Clean water supply in villages of Niphad marathi news)

त्याचे फलित म्हणून फेब्रुवारीत निफाड तालुक्यातील १३३ स्त्रोतांचे पाणी नमुने तपासण्यात आले. ते सर्व शुद्ध व पिण्यास योग्य आले आहेत. निफाड तालुक्यातील ११८ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना, हातपंप, विहीर याद्वारे नागरिकांची तहान भागविली जाते. हे पाणी शुध्द असण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी टीसीएल पावडरने त्याचे शुद्धीकरण करतात.

आरोग्य कर्मचारी शुद्धीकरण झाले आहे की नाही यासाठी ओटी टेस्ट घेतात. ओटी टेस्ट सकारात्मक आली तरच पाणी पुरवठा केला जातो. नकारात्मक आली तर पुन्हा शुद्धीकरण होते. निफाड तालुक्यात ६२९ जलस्त्रोत आहेत. दरमहा दहा टक्के स्त्रोताचे नमुने निफाडच्या उपविभागीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. (latest marathi news)

Santhosh Khalkar, health worker taking OT test of drinking water.
Nashik News : मालेगावातील वीजचोरीच्या चौकशीचे आदेश; प्लास्टिक कारखान्यांचाही समावेश

फेब्रुवारीत पिंपळगाव बसवंत, ओझर, कसबे सुकेणे, पालखेड, खडक माळेगाव, चांदोरी, म्हाळसाकोरे, नैताळे, देवगाव, निमगाव वाकडा आदी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १३३ स्त्रोताचे पाणी नमुने आरोग्य व ग्रामपंचायत विभागाच्या माध्यमातून तपासणीसाठी पाठविण्यात आले होता.

याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यातील सर्वच पाणी नमुने हे पिण्यास योग्य असल्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे. यामुळे जलजन्य आजार टळणार असून नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यास मदत होणार आहे.

''ग्रामपंचायत कर्मचारी पाणी शुद्धीकरण केल्यानंतर आरोग्य विभागाकडून त्यांची ओटी टेस्ट केली जाते. ओटी सकारात्मक आल्याशिवाय पाणी पुरवठा करण्याला मज्जाव केला जातो. ओटी नकारात्मक आल्यास ग्रामपंचायत प्रशासनाला कळवून योग्य त्या उपाययोजना केल्या जातात.''- संतोष खालकर (आरोग्य सेवक, नांदुर्डी).

Santhosh Khalkar, health worker taking OT test of drinking water.
Nashik News : सावकाराच्या ताब्यातून सोडविले तरुणाचे वाहन; ओझर पोलिसांची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.