Cleanliness Campaign : लोकसंख्येचा विस्तार, कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आणि पालिकेचे अपयश, त्यामुळे शहराचा विस्तार आणि लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामानाने पालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या नगण्य आहे. शहराची स्वच्छता ठेवायची असेल, तर नागरिकांनाच पुढाकार घ्यायला पाहिजे. यासाठी ‘होय, मीच जबाबदार येवलेकर!’ ही स्वच्छता चळवळ सामाजिक कार्यकर्त्यांनी हाती घेतली आहे. शहरवासीयांची १ ऑगस्टपासून मोहिमेला सुरवात करण्यात येणार आहे. (cleanliness campaign of city dwellers will be started from 1 August in yeola )
एकेकाळी स्वच्छता अभियानाचे पुरस्कारप्राप्त पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात ठिकठिकाणी गटारी, डबके साचत असून, डासांचे साम्राज्य वाढले आहे. शहरभर मोकाट गायी फिरताना दिसतात. त्यांनी केलेली घाण चिंतेचा विषय बनत आहे. वाढती लोकसंख्या व शहराबाहेर नववसाहतींचा झालेला विस्तार यास कारणीभूत असून, पालिकेकडे स्वच्छता कर्मचाऱ्यांची अपुरी संख्येमुळे अस्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे.
यावर मार्ग काढण्यासाठी विद्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश पटेल यांनी पुढाकार घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरातील जागरूक नागरिकांना आवाहन करत ‘होय, मीच जबाबदार येवलेकर’ मोहीम हाती घेतली आहे. याविषयी जनजागृतीसाठी मर्चंट बँकेच्या सभागृहात नागरिकांची बैठक झाली. बैठकीला व्यापारी, डॉक्टर्स, वकील, सामाजिक, राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी उपक्रमाचे स्वागत करत सक्रियपणे सहभाग नोंदविण्याचा शब्द दिला.
१ ऑगस्टपासून शहरात दररोज जनजागृती रॅलीचे आयोजन, चौकाचौकांत पथनाट्य सादर करणे, वार्डनिहाय बैठकांचे आयोजन करणे, पत्रके काढून स्वछतेबाबत नागरिकांना आवाहन करणे, जागोजागी कृत्रिम कचराकुंड्या, पालिकेच्या स्वच्छता विभागाला सहकार्य करणे, परिसर स्वच्छ ठेवणे आदी निर्णय या वेळी बैठकीत घेण्यात आले. (latest marathi news)
युवा नेते कुणाल दराडे, डॉ. संकेत शिंदे, प्रवीण बनकर, पालिकेचे स्वच्छता निरीक्षक सागर झावरे, ॲड. जुगलकिशोर कलंत्री, डॉ. शरद पाटील, राहुल लोणारी, अनिरुद्ध पटेल, योगेश सोनवणे, हितेंद्र पगार, डॉ. महेश्वर तगारे, डॉ. खैरनार, सुहास भांबारे, जयवंत खांबेकर, दीपक पाटोदकर, संजय शिंदे, सचिन सोनवणे, अतुल घटे, धीरज परदेशी, भूषण शिनकर, प्रीतम पटणी, अक्षय राजपूत आदी उपस्थित होते.
असा ठरला उपक्रम
- नागरिकांनी कचरा फक्त घंटागाडीतच टाकावा
- नागरिकांनी कचरा कचराकुंडीत टाकावा, पालिकेने तो वेळोवेळी उचलावा
- पालिकेने घंटागाड्यांची संख्या वाढवावी, कचराकुंड्यांची व्यवस्था करावी
- सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी
- जनजागृती मोहीम सतत चालू ठेवावी
- मोकाट कुत्रे व जनावरांसाठी वेगळी मोहीम हाती घेऊन त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा
- प्रत्येक समाजप्रमुखांनी त्यांच्या समाजातील लोकांचे प्रबोधन करावे
- कचरा जिथे जास्त जमा होतो अशी ठिकाणी शोधणे व त्यासाठी योग्य व्यवस्था करणे
- कचरा विलगीकरणाचे महत्त्व लोकांना समजवावे
''शहराच्या हितासाठी अभियान हाती घेतले असून, मुख्य हेतू फक्त स्वच्छता नसून स्वच्छतेची सवय लोकांना लावणे व त्याबद्दल जनमानसांत जागृती करणे, हा आहे. नागरिकांनी कचरा कचराकुंडीतच टाकावा, ही सवय लावण्याचा हेतू आहे.''- डॉ. राजेश पटेल, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.