Nashik News : ‘काश्‍यपी’मधून गंगापूर धरणात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा

Nashik News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अपुरा पाणीसाठा असल्याने काश्यपी धरणातून पाणी सोडण्याची नियोजन जलसंपदा विभागाने केले.
Kashyapi dam
Kashyapi dam esakal

Nashik News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अपुरा पाणीसाठा असल्याने काश्यपी धरणातून पाणी सोडण्याची नियोजन जलसंपदा विभागाने केले, मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यास विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. २८) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. (Clear way to release water from Kashyapi to Gangapur dam)

शेतकऱ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन २५ टक्के पाणी आरक्षित करण्यासाठी मागणी नोंदविण्याच्या सूचना देण्याबरोबरच महापालिकेशी संबंधित प्रश्न सोडविण्याच्या निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर काश्‍यपीमधून गंगापूर धरणात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने गंगापूर धरण समूहामध्ये अपुरा पाणीसाठा निर्माण झाला.

त्यात मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने मराठवाड्यासाठी ८.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे महापालिकेने जलसंपदा विभागाकडे नोंदवलेली ६१०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी घटविण्यात आली. नाशिक शहरासाठी गंगापूर धरणातून पाणी आरक्षित करताना ५३१४ दशलक्ष घनफूट आरक्षण देण्यात आले.

त्यामुळे ३१ जुलैपर्यंत पाण्याचे आरक्षण लक्षात घेता अठरा दिवसांचा पाण्याचा शॉर्टफॉल निर्माण झाला. जून महिन्यात पाऊस येईल, असा अंदाज होता. मात्र जून महिना कोरडा जात असल्याने महापालिकेने पाणी बचतीची तयारी सुरू केली. (latest marathi news)

Kashyapi dam
Nashik Encroachment : मालेगावातील 60 अतिक्रमणे हटविली! मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा दूर

त्यात जलसंपदा विभागाकडून काश्‍यपी धरणातील जवळपास ४२५ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याची तयारी झाली असतानाच स्थानिक शेतकऱ्यांनी ३० टक्के पाणी राखून ठेवण्याचा मागणी करत पाणी सोडण्यास विरोध केला. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात कमी विसर्गाने पाणी सोडण्यास सुरवात झाली. दरम्यान याच संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

काश्‍यपीत २५ टक्के पाणी आरक्षण

काश्‍यपी धरण परिसरात नागरी वस्ती वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर २५ टक्के पाणी आरक्षणाबाबत निर्णय घेऊन पाणी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत सामावून घेणे, प्रकल्पग्रस्तांना दाखले व पुनर्वसनाचे विषय मार्गी लावण्याचे आश्‍वासन देण्यात आले.

जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिकेचे अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत तसेच काश्‍यपी पाणी अडवा समितीचे कैलास बेंडकोळी, सागर पिंपळके, तुळशीदास बेंडकोळी, सागर तुपलोंढे, राजू मोरे, हरिभाऊ बेंडकोळी, राजाराम बेंडकोळी, मंगळू पिंपळके आदी उपस्थित होते.

Kashyapi dam
Nashik ZP News : जिल्हा परिषदेत 78 कर्मचाऱ्यांचे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com