Nashik Crime : बंदी असलेल्या औषधांची रेल्वेतून वाहतूक; पुष्पक एक्स्प्रेसमधून कोच अटेंडंटला अटक

Nashik Crime : पुष्पक एक्स्प्रेसमधून वाहतुकीस प्रतिबंध असलेल्या औषधांच्या बॉटल आणि गोळ्यांची वाहतूक करताना पोलिसांनी कोच अटेंडंट यास ताब्यात घेतले. rail
Officers, employees of the Railway Police Force after arresting the suspect for transporting banned drugs from Pushpak Express.
Officers, employees of the Railway Police Force after arresting the suspect for transporting banned drugs from Pushpak Express.esakal
Updated on

नाशिक रोड : पुष्पक एक्स्प्रेसमधून वाहतुकीस प्रतिबंध असलेल्या औषधांच्या बॉटल आणि गोळ्यांची वाहतूक करताना पोलिसांनी कोच अटेंडंट यास ताब्यात घेतले. याप्रकरणी अन्न व औषध विभागाला कळविण्यात आले असून त्यांच्याकडून पुढील कारवाई केली जाणार आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये सायंकाळी पाचला एका बोगीच्या बाथरूम जवळ तीन बॅगा ठेवण्यात आलेल्या होत्या. एक्स्प्रेसमध्ये पेट्रोलिंग करत असताना आरपीएफच्या जवानांना तीन बॅग्स आढळून आला. (Coach attendant arrested from Pushpak Express for transportation of banned drugs by rail)

याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता कोच अटेंडंट आफताब अहमद (वय ४०, रा. अमिनाबाद, लखनऊ) याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता अहमदने सांगितले की , लखनऊ येथे राहणाऱ्या सलमान सिद्दिकीने याने बॅगांमध्ये औषधे दिले आहेत. ती सीएसएमटीला आहेरान अहमद नामक व्यक्तीला द्यायचे आहे. त्या मोबदल्यात मला पाचशे रुपये देणार असल्याचे त्याने सांगितले.

Officers, employees of the Railway Police Force after arresting the suspect for transporting banned drugs from Pushpak Express.
Nashik Crime News : महिलेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह प्रेयसीला अटक! संशयितांना तीन दिवस पोलीस कोठडी

यावर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या बॅगा खोलून तपासणी केली असता त्यांना गोळ्यांची पाकिटे, १६० बॉटल कफ सिरफ मिळून आले. यानंतर पोलिसांनी याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली असता विभागाने ही औषधे रेल्वेतून वाहतूक करणाऱ्यास पूर्णतः बंदी असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी कोच अटेंडंट आफताब अहमद यास ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Officers, employees of the Railway Police Force after arresting the suspect for transporting banned drugs from Pushpak Express.
Nashik Crime : जेलरोड येथे हवेत गोळीबार; 3 दिवसांनी वाच्यता : एकाला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.