पिंपळगाव बसवंत : गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वात आबालवृद्ध सहभागी होतात. भक्तीभावाने ‘श्री’ना नारळ, दुर्वा अर्पण केल्या जातात. साहजिकच पूजेच्या साहित्यासह तोरणांसाठी नारळाच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सव व दसरा कालावधीपर्यंत किरकोळ नारळ विक्री हा सर्वसामान्यांच्या संसाराचा गाडा हाकण्याचे साधनच बनले आहे. त्यातून निफाड तालुक्यातील अनेक कुटुंबांचा या व्यवसायावरच उदरनिर्वाह चालत आहे. (Coconut 20 percent increase in sales in Ganeshotsav)