इगतपुरी : नारळाची झाडे साधारणपणे किनारपट्टीवर आढळतात. आता ती इगतपुरी तालुक्यातही दिसू लागली आहेत. यशस्वी उत्पादन व इगतपुरीच्या हवामानास योग्य ठरतील, अशा तीन जातीच्या यशस्वी नारळाची लागवड नांदूरवैद्यचे शेतकरी राधारमन दवते यांनी केली आहे. (Nashik Coconut plantation in Igatpuri talukamarathi news)
राधारमण दवते यांनी केंद्र सरकारच्या कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डच्या उपसंचालक व रत्नागिरी येथील राज्य शासनाच्या कोकण संशोधन केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने तीन जातींच्या नारळाची लागवड केली आहे. उंच जातीचे ‘प्रताप’ या मध्यम गोल नारळ देणाऱ्या माडाची, तर दुसरे ‘टीडी’ या मध्यम उंचीच्या संकरित जातीची आणि ‘गंगाबोडम’ या बुटक्या जातीची लागवडीसाठी निवड केली.
नारळ लागवडीचे अंतर इतर आंतरपिकासाठी अत्यंत सोयीस्कर आहे. त्यामुळे कोरड्या हवामानात यशस्वी ठरलेली पिकांची लागवड नारळांमधील पट्ट्यात केली जाऊ शकते. त्यांनी गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रयोग म्हणून केलेली केळी, हळद यांची लागवड अत्यंत यशस्वी ठरली. (Latest Marathi News)
केळी व नारळ ही परस्परपूरक पिके आहेत. केळीत भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेला ‘फॉस्फेट’ हा घटक नारळाच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त असतो. त्याशिवाय अद्रक, पपई, अननस आदी आंतरपिके घेताना मनुष्यबळ असले, तर भाजीपाला पिकेही घेता येतात. भविष्यात कोकणात येणारी व कायमस्वरुपी उत्पन्न देणारी दालचिनी, मिरी, जायफळ आदी मसाले पिके लागवडीचा इरादा असल्याचे श्री. दवते यांनी सांगितले.
'नारळ लागवडीत पूर्व नियोजन आवश्यक आहे. या सर्वांगाने अभ्यास करून, काही बागांना भेटी देऊन व नारळ संशोधन केंद्रातील तज्ज्ञांशी बोलून नाशिक जिल्ह्यात लागवड करण्याचे ठरविले."-राधारमन दवते, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.