Nashik Coconut Price Hike : तेलानंतर आता खोबरे वधारले; किलोमागे सरासरी 100 रुपयांची वाढ

Coconut Price Hike : पितृपक्षात बाजारपेठेत सहसा मंदीचे वातावरण असते; परंतु गेल्या सप्ताहात तेल व क्रूड ऑइलवरील आयात शुल्क वाढविल्याने खाद्यतेलाच्या भावात उच्चांकी वाढ झाली.
Coconut Price
Coconut PriceSakal
Updated on

नाशिक : पितृपक्षात बाजारपेठेत सहसा मंदीचे वातावरण असते; परंतु गेल्या सप्ताहात तेल व क्रूड ऑइलवरील आयात शुल्क वाढविल्याने खाद्यतेलाच्या भावात उच्चांकी वाढ झाली. त्याचा परिणाम जीवनावश्‍यक वस्तूंवर होत आहे. तेल, हरभराडाळ व खोबरे यांच्या दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. गेल्या आठवड्यात १६० ते १८० रुपयांच्या दरम्यान असलेले खोबरे आता थेट २६० ते २८० रुपये किलोवर गेले आहे. केंद्र सरकारने खाद्यतेल व क्रूड ऑइलच्या आयात शुल्कात १२ ते ३२.५ टक्के दरवाढ केल्याने तेलाच्या दरात लिटरमागे २० ते ३० रुपयांची दरवाढ झाली. (coconut price increased by an average of Rs 100 per kg )

चार दिवसांपूर्वी पुन्हा तेलाच्या बाजारभावात लिटरमागे तीन ते पाच रुपयांची दरवाढ झाली. ऐन सणासुदीच्या प्रारंभालाच खोबऱ्याचे भाव १६० ते १८० वरून थेट २६० ते २८० रुपयांवर गेले आहेत. इतर तूर, मूग, मसूर, उडीदडाळीचे दर स्थिर होते. हरभराडाळीचे दर किलोमागे दहा ते पंधरा रुपयांनी वाढले आहेत. याचा परिणाम तयार बेसनपिठाच्या दरावरही झाला आहे.

खोबरे राजापुरीच्या दरात शंभराने वाढ झाली आहे, तर केरळ व इतर राज्यांतून येणाऱ्या खोबऱ्याच्या दरात ७५ ते ८० रुपयांची वाढ झाली आहे. नारळाच्या दरात शेकडा तीनशे ते चारशे रुपयांची वाढ झाली आहे. शेंगदाण्याच्या दरात क्विंटलमागे तीनशे ते साडेतीनशे रुपयांची दरवाढ झाली आहे. तेलाच्या दरात लिटरमागे अजून पाच ते दहा रुपये दरवाढ होऊ शकते, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. (latest marathi news)

Coconut Price
Edible Oil Price Hike : 8 दिवसात तेलाच्या किंमतीत 20 ते 25 प्रति किलोने वाढल्या... गृहिणी आणि गणेश भक्तांचे बजेट कोलमडले

अशी आहे दरवाढ

पदार्थ---- आधीचे दर-- वाढलेले दर

सोयाबीन तेल ः १०५ १२० ते १३०

सूर्यफूल तेल ः ११५ १२५ ते १३५

खोबरे ः १६० २२० ते २६०

हरभराडाळ ः ९०/१०० ११० ते ११५

''तेलाच्या आयात शुल्कात वाढ झाल्याने खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे. नारळाचे पीक कमी त्यामुळे नारळ व खोबऱ्याच्या दरात वाढ झाली आहे.''-रितेश बूब, घाऊक व्यापारी

''पितृपक्षात तसेच दसरा दिवाळीच्या तोंडावर तेल, हरभराडाळ, खोबरे अशा जीवनावश्यक वस्तूंच्या भावात प्रचंड वाढ झाल्याने घराचे व्यवस्थापन कोलमडले. सरकारने दर कमी करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे.''-रेखा चौधरी, गृहिणी

Coconut Price
Nashik Egg Price Hike: थंडी पडताच अंड्यांच्या दरात वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.