Nashik News : ब्लॅक स्पॉटवरील अतिक्रमण काढण्यास आचारसंहितेचे ‘निमित्त’! दीड वर्षांपासून प्रस्तावित प्रक्रिया 3 महिने लांबली

Nashik News : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देत महापालिकेच्या नगररचना व अतिक्रमण विभागाने ब्लॅक स्पॉटवरील अतिक्रमण काढण्यास नकार दिला आहे
Accidental Black Spot
Accidental Black Spotesakal
Updated on

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देत महापालिकेच्या नगररचना व अतिक्रमण विभागाने ब्लॅक स्पॉटवरील अतिक्रमण काढण्यास नकार दिला आहे. वास्तविक दीड वर्षांपासून अतिक्रमण काढण्याचे प्रस्तावित आहे. मात्र अद्यापपर्यंत अतिक्रमणे हटविली नाही. मात्र आता आचारसंहितेचे कारण देत पुढील तीन महिने प्रक्रिया लांबविण्यात आली आहे. (Nashik Code of conduct excuse to remove encroachment on black spot proposed process dragged on for 3 months after one half years marathi news)

ऑक्टोबर २०२२ मध्ये छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हॉटेल मिरची चौकात पहाटे प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये २२ प्रवासी होरपळून मृत्यूमुखी पडले. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत ब्लॅक स्पॉटचे तातडीने सर्वेक्षण करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलिस, शहर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग, नाशिक महापालिका यांच्या संयुक्त समितीने सर्वेक्षण केले. त्यानुसार शहरात २६ ब्लॅक स्पॉट आढळून आले. अतिक्रमणे हटविण्याची कारवाई तातडीने करण्यासाठी प्रस्तावदेखील सादर झाले.

महापालिकेला पोलिस बळाची आवश्यकता होती. पोलिसांनी प्रस्तावानुसार बंदोबस्त पुरविण्याचीदेखील व्यवस्था केली. मात्र नगररचना व अतिक्रमण विभागातून टोलवाटोलवी झाल्याने अतिक्रमण काढले गेले नाही. ज्या भागात अपघात झाला, त्या हॉटेल मिरची चौकातील अतिक्रमणे महापालिकेने हटविली, मात्र इतर ठिकाणची अतिक्रमण जैसे-थे राहिली.

नगररचना विभागाकडून रेखांकन केले जात नसल्याचे अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले. तर अतिक्रमण विभागाकडून यादी मिळत नसल्याने रेखांकन करता येत नसल्याचे नगररचना विभागाकडून सांगितले जात आहे. अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात तब्बल पाच वेळा पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु अद्यापपर्यंत अतिक्रमण हटले गेले नाही. आता लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे कारण देत ब्लॅक स्पॉट वरील अतिक्रमणे काढण्यासंदर्भात चालढकल केली जात आहे.  (latest marathi news)

Accidental Black Spot
NMC News : होर्डिंग घोटाळ्याचा अहवाल नव्हे, अभिप्राय; संघटना न्यायालयात जाणार

मुहूर्ताचा शोध

२६ ब्लॅक स्पॉटवरील अतिक्रमण काढण्यासाठी दीड वर्षांपासून चालढकल केली जात आहे, आता मात्र लोकसभेच्या आचारसंहितेचे कारण दिले जात आहे. २३ जानेवारी २०२३ त्याचप्रमाणे २० मार्च २०२३ पुढे ११ एप्रिल २०२३ त्यानंतर १२ जून २०२३ व ११ ऑगस्ट २०२३ असे पाच वेळेस नगररचना विभागाला स्मरणपत्र देण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत दखल घेण्यात आली नाही.

"अपघातांच्या ब्लॅक स्पॉटवरील अतिक्रमण लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरच कारवाई केली जाणार आहे. नगररचना विभागाकडून डिमार्केशन झाल्याने विलंब झाला."- नितीन नेर, उपायुक्त, अतिक्रमण विभाग.

Accidental Black Spot
NMC News : सुशिक्षित बेरोजगारांना महापालिका देणार गाळे! कर विभागाकडून जप्ती मोहीम; अटी शर्तींवर होणार हस्तांतरित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.