Nashik Revenue Recovery: महसूल वसुलीला आचारसंहितेचा अडसर! मार्चपर्यंत 279 कोटींचे उद्दिष्ट; आतापर्यंत 96 कोटी 23 लाखांची वसुली

Latest Nashik News : जिल्हा महसूल प्रशासनाला २०२३-२४ अखेरपर्यंत २१९ कोटी २५ लाख रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट होते.
recovery
recoveryesakal
Updated on

Nashik Revenue Recovery : राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला मार्चअखेर २७९ कोटी ३१ लाख रुपयांचे महसूल वसुलीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विधानसभा निवडणुकीचा अडसर निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या ९६ कोटी २३ लाख म्हणजेच ३४.४५ टक्के वसुली पूर्ण झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ६ टक्क्यांनी कमी आहे. (Code of Conduct Obstacle to Revenue Recovery)

जिल्हा महसूल प्रशासनाला २०२३-२४ अखेरपर्यंत २१९ कोटी २५ लाख रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यात जमीन महसुलातून १०९ कोटी ३१ लाख, गौण खनिजातून १०९ कोटी ९४ लाख रुपये वसुलीचे उद्दिष्ट होते. ३१ ऑगस्ट २०२३ अखेर हे उद्दिष्ट ३९.७६ टक्के, तर मार्च २०२४ अखेर ते १०० टक्के वसूल झाले होते.

यंदा मात्र महसूल वसुली कासवगतीने सुरू असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत समोर आले आहे. यंदाच्या वर्षी राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला दिलेले २७९ कोटी ३१ लाख रुपयांच्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट सप्टेंबरअखेर ५० ते ५५ टक्के पूर्ण होणे अपेक्षित आहे; परंतु सध्या केवळ ३४.४५ टक्के वसुली झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी महसूल वसुलीच्या संथ कारभारावरून तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली. (latest marathi news)

recovery
98th Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह जाहीर,राज ठाकरेंकडून निवड; शिवरायांच्या राजमुद्रेचा समावेश

येथे वसुली कमी

जिल्ह्यात निफाड, पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, बागलाण या तालुक्यांमध्ये महसूल वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. नाशिक तालुका, मालेगाव, येवला, चांदवड, देवळा आणि सुरगाणा या तालुक्यांमध्ये मात्र वसुली तुलनेने चांगली झाली असल्याचे दिसत आहे.

येथे सर्वाधिक वसुली

प्रशासनाला यंदा ३१ ऑगस्टअखेर ३१ कोटी ४४ लाख (२८.७६ टक्के) महसूल मिळाला आहे. गौण खनिजच्या माध्यमातून ६४ कोटी ७८ लाख (३८.११ टक्के) महसुलाची वसुली झाली आहे. यात नाशिक, निफाड, मालेगाव आणि येवला उपविभागीय अधिकाऱ्यांकडून समाधानकारक वसुली झाली आहे.

recovery
Nashik News : बागलाणच्या तरुणांचा अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.