NAFED News : कोट्यवधींचे ‘नाफेड’चे शीतगृह धूळखात! कांद्याचे शीतगृह की सर्पगृह

Nashik News : तीस वर्षांपूर्वी ‘नाफेड’ने पिंपळगाव बसवंत येथे उभारलेले शीतगृह आता धूळखात पडले आहे. विषारी सापांचा या शीतृगहात मोठ्या प्रमाणात वावर सुरू असतो.
The cold storage of 'NAFED', which was built at the cost of crores of rupees, but fell into dust due to lack of use.
The cold storage of 'NAFED', which was built at the cost of crores of rupees, but fell into dust due to lack of use.esakal
Updated on

पिंपळगाव बसवंत : कांदा खरेदीत सातत्याने वादाच्या भोवऱ्यात असलेल्या ‘नाफेड’च्या यंत्रणेचा तुघलकी कारभाराचा आणखी एक अजब नमुना पुढे आला आहे. तीस वर्षांपूर्वी ‘नाफेड’ने पिंपळगाव बसवंत येथे उभारलेले शीतगृह आता धूळखात पडले आहे. विषारी सापांचा या शीतृगहात मोठ्या प्रमाणात वावर सुरू असतो. (Cold storage of billions of NAFED in dust)

ही वास्तू कांद्याचे शीतगृह की सर्पगृह, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे दहा वर्षांपासून हे शीतगृह उघडलेच नसल्याचे समोर आले आहे. कांद्याचे दर कोसळतील तेव्हा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने ‘नाफेड’ संस्था अस्तित्वात आणली. मात्र ‘नाफेड’चा लाभ शेतकऱ्यांना होण्यापेक्षा अधिकाऱ्यांनाच जास्त झाल्याचे अनेकदा समोर आले आहे.

भ्रष्टाचारामुळे ही यंत्रणा सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकली. कांदा खरेदीचे गौडबंगाल कायम असतानाच ‘नाफेड’ने उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधाही औटघटकेच्या ठरल्या आहेत. त्याचे जीवंत उदाहरण म्हणजे पिंपळगावला महामार्गावर ‘नाफेड’ कार्यालयालगत उभारण्यात आलेले शीतगृह मे १९९३ मध्ये दोन एकर जागेत प्रशस्त शीतगृह उभारण्यात आले.

कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या शीतगृहाचे उद्‍घाटन तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री डॉ. बलराम जाखड यांच्या हस्ते झाले. सेवन सिग्मा कंपनीने उभारलले व सुमारे ७० टन क्षमता असलेल्या या शीतगृहाचा प्रारंभी वापर झाला. कांद्याचे आयुर्मान वाढविण्यासाठीचा यामागे हेतू होता. पण, पंधरा ते वीस वर्षांपासून हे शीतगृह वापरात नसून ते भंगारात निघाल्याची स्थिती आहे. शीतगृह उभारणीच्या उद्देशाला हरताळ फासला गेल्याने ही वास्तू भंगारात निघाल्याचे दिसत आहे. (latest marathi news)

The cold storage of 'NAFED', which was built at the cost of crores of rupees, but fell into dust due to lack of use.
Nashik News : आयुक्तालयातील प्रभारींवर ‘खांदेपालटा’ची टांगती तलवार; सहायक आयुक्तांमध्ये फेरबदलाची चर्चा

शीतगृह की सर्पगृह

कांद्याची टिकवण क्षमता वाढवून दर टिकवून ठेवण्यासाठी बांधण्यात आलेले हे शीतगृह आता कोब्रासारख्या विषारी जातीच्या सापांचे माहेरघर बनले आहे. पंधरा वर्षांपासून या शीतगृहाला टाळे लावण्यात आले आहे. शीतगृहाच्या चारही बाजू झाडाझुडपांनी व्यापल्या आहेत. तेथील सर्प शीतगृहात मनसोक्त संचार करताना दिसतात. शीतगृह की सर्पगृह, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे येण्याला फारसे कुणी धजावत नाही.

कांद्यासाठी उभारण्यात आलेल्या चाळीची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता भाडेतत्त्वावर देण्यासाठी दोनदा निविदा प्रक्रिया राबविली. पण, त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले. ‘नाफेड’कडून नवा प्रकल्प येथे राबविणे विचाराधीन असल्याची स्पष्टोक्ती या वेळी देण्यात आली.

The cold storage of 'NAFED', which was built at the cost of crores of rupees, but fell into dust due to lack of use.
Nashik Accident News : 'एक्साईज'चे वाहन उलटून चालक ठार; मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करतानाची घटना

"कांद्याचे दर स्थिरीकरणाच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या शीतगृहाची दुरवस्था दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यापेक्षा वादाच्याच भोवऱ्यात ‘नाफेड’ अधिक असते. त्याचे हे पुन्हा एक उदाहरण आहे. कांद्याचा प्रश्‍न घेऊन मी निवडणूक लढलो. त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची माझी भूमिका प्राधान्याने आहे. ‘नाफेड’च्या अध्यक्षांपुढे हा पिंपळगाव शीतगृहाचा विषय मांडणार आहे. लोकसभेतही याबाबत प्रश्‍न उपस्थित केला जाईल." - भास्कर भगरे, खासदार, दिंडोरी

"शेतकऱ्यांचा जीवन-मरणाचा प्रश्‍न असलेल्या कांद्याच्या दराबाबत ‘नाफेड’ची भूमिका कुचकामी आहे. तेथे शेतकऱ्यांच्या जीवावर उभारण्यात आलेल्या शीतगृहाची दुरवस्था यात नवल काही नाही. दुय्यम दर्जाच्या कांदा व्यापाऱ्यांकडून चढ्या दराने खरेदी करून अधिकारी व लोकप्रतिनिधी ‘नाफेड’च्या माध्यमातून स्वत:चे उखळ पांढरे करून घेत आहेत." - गणेश निंबाळकर, जिल्हाध्यक्ष, प्रहार

The cold storage of 'NAFED', which was built at the cost of crores of rupees, but fell into dust due to lack of use.
Nashik Railway : सलग दुसऱ्या दिवशी ‘पंचवटी’सह अनेक गाड्या रद्द! नाशिकच्या प्रवाशांचे हाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com