Sant Nivruttinath Palkhi : संत निवृत्तिनाथ महाराजांचा पालखी सोहळा भक्तीची यात्रा : जलज शर्मा

Nashik News : शासन वारीसाठी सेवा देण्यासाठी यापुढे अधिक परिश्रम घेईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शनिवारी (ता. २२) वारकऱ्यांना दिले.
Collector Jalaj Sharma and Municipal Commissioner Ashok Karanjkar who took darshan of Sant Nivruttinath Maharaj.
Collector Jalaj Sharma and Municipal Commissioner Ashok Karanjkar who took darshan of Sant Nivruttinath Maharaj.esakal
Updated on

Nashik News : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांचा दिंडी पालखी सोहळा खऱ्या अर्थाने भक्तीची यात्रा आहे. शासन वारीसाठी सेवा देण्यासाठी यापुढे अधिक परिश्रम घेईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शनिवारी (ता. २२) उपस्थित वारकऱ्यांना दिले. संत निवृत्तिनाथ महाराजांचा पालखी सोहळा शनिवारी सकाळी साडेनऊला सातपूरहून नाशिक पंचायत समिती कार्यालयाजवळ दाखल झाला. (Sant Nivruttinath Palkhi)

या वेळी स्वागत समितीतर्फे पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. यंदा दिंडी सोहळ्यात ५० हून अधिक मुख्य दिंड्या सहभागी झाल्या आहेत. स्वागत समितीतर्फे नाशिक पंचायत समितीच्या प्रांगणात वारकरी, विणेकरी यांचे स्वागत करण्यात आले. याठिकाणी इच्छामणी केटरर्सतर्फे वारकऱ्यांसाठी चहा, नाश्‍त्याची व्यवस्था करण्यात आली होती.

महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांनी वारकऱ्यांना ऊन-पावसात पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी वारी करताना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला; तर संत निवृत्तिनाथ संस्थानच्या अध्यक्षा कांचनताई जगताप यांनी स्वागत समितीने केलेल्या वारी सोहळ्याच्या स्वागताबद्दल ऋणी असल्याचे सांगितले.

प्रशासनाने वारीसाठी भरीव मदत दिली आहे, त्यामुळे यंदाची वारी आनंदात होईल, असे सांगितले. महंत भक्तिचरणदास महाराज यांनी, पालखीत सामील वारकरी वैष्णव आपल्या धर्माची सेवा करतात. या वैष्णवांना माझा दंडवत, हा पांडुरंगाच्या दर्शनाचा भक्तीचा महिमा आहे, असे सांगितले. (latest marathi news)

Collector Jalaj Sharma and Municipal Commissioner Ashok Karanjkar who took darshan of Sant Nivruttinath Maharaj.
Sant Nivruttinath Palkhi : मुख्यमंत्र्यांनी घेतली दिंडीकऱ्यांची भेट!

संस्थानचे माजी अध्यक्ष नीलेश गाढवे यांनी वारीमार्ग राजमार्ग करण्यासाठी राज्य शासनाकडे मागणी केल्याचे सांगितले. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी, वारीची नाशिकच्या मुक्कामाची सेवा घडते, हेही पुण्याचा ठेवा असल्याचे सांगितले. या वेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त अशोक करंजकर, जिल्हा परिषद प्रकल्प अधिकारी प्रतिभा संगमनेरे.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, वर्षा फडोळ, महंत भक्तिचरणदास महाराज, महामंडलेश्वर डॉ. रामकृष्ण लहवितकर, बाळासाहेब देहूकर, बेलापूरकर महाराज, स्वागत समितीप्रमुख पद्माकर पाटील, त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिकराव थेटे, माणिक देशमुख, भाऊसाहेब गंभीरे, शिवाजी चुंभळे, रत्नाकर चुंभळे.

महंत संपत धोंडगे, कांचनताई जगताप, सचिव अमर ठोंबरे, माजी अध्यक्ष नीलेश गाढवे, पालखी सोहळाप्रमुख मुठाळ, रमेश कडलग, सचिन डोंगरे, राहुल बर्वे, ॲड. भरत ठाकरे, विवेक उगलमुगले, विष्णू थेटे यांच्यासह अनेक वारकरी, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Collector Jalaj Sharma and Municipal Commissioner Ashok Karanjkar who took darshan of Sant Nivruttinath Maharaj.
Sant Nivruttinath Palkhi : सातपूर गावातून पालखीसमवेत 47 दिंड्या; ग्रामस्थांसह पोलिसांकडून पालखीचे स्वागत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.