Nashik News : स्टार्टअप समिट नवनवीन कलाविष्कारांना प्रोत्साहन : जिल्हाधिकारी जलज शर्मा

Nashik : निमातर्फे आयोजित स्टार्टअप समिट राज्यातील उद्योजकांसाठी दिशादर्शक ठरेल आणि त्याने उद्योग क्षेत्रातील नवनवीन कलाविष्कारांना प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.
District Collector Jalaj Sharma while inaugurating the Startup Summit at NIMA Complex on Thursday. dignitaries with
District Collector Jalaj Sharma while inaugurating the Startup Summit at NIMA Complex on Thursday. dignitaries withesakal
Updated on

Nashik News : निमातर्फे आयोजित स्टार्टअप समिट राज्यातील उद्योजकांसाठी दिशादर्शक ठरेल आणि त्याने उद्योग क्षेत्रातील नवनवीन कलाविष्कारांना प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. या व्यासपीठाचा लाभ घेऊन उद्योजकांनी आपली उन्नती साधावी, असे आवाहनही त्यांनी केले. नाशिक इंडस्ट्रीज ॲन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे निमा संकुल परिसरात आयोजित राज्यातील पहिल्याच निमा स्टार्टअप समिटचा शुभारंभ गुरुवारी (ता. २५) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते झाला. ()

जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त अजित दान, निमा अध्यक्ष धनंजय बेळे, सचिव निखिल पांचाळ आणि कौशल्य विकास विभागाच्या सहसंचालक अनिसा तडवी यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्योजकांच्या नवनवीन कलाविष्कारांना पाठबळ, मार्गदर्शन तसेच त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे निमाचे कार्य कौतुकास्पद आहे. उद्योग क्षेत्राला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्याची गरज असून त्या दृष्टीनेच हे निमाचे प्रयत्न सुरू असल्याचे जीएसटी अतिरिक्त आयुक्त अजित दान यांनी सांगितले.

कौशल विकास विभागाच्या सहसंचालक अनिसा तडवी यांनी जिल्ह्यातील स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी शासनातर्फे सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. निमा स्टार्टअप समिटच्या माध्यमातून अडीचशेहून अधिक स्टार्टअप आणि शंभरहून अधिक युवा व महिला उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असून त्यात आम्ही निश्चितच यशस्वी झाल्याच्या अभिमान वाटतो आणि राज्यातील उद्योजकांसाठी आम्ही आदर्श निर्माण करणार,असा विश्वास निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी व्यक्त केला.  (latest marathi news)

District Collector Jalaj Sharma while inaugurating the Startup Summit at NIMA Complex on Thursday. dignitaries with
Nashik News : संलग्‍नता तपासा, माहितीची पडताळणी करा..! पुणे विद्यापीठातर्फे प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांसाठी सूचना जारी

समिटमध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील २००हून अधिक गुंतवणूकदारांनाही पाचारण करण्यात आले आहे. स्टार्टअप, उद्योग उभारणी, पेटंट नोंदणीची माहिती, बँका व शासनाच्या विविध योजनांची माहिती सुद्धा समिटमध्ये विविध चर्चासत्राद्वारे उपलब्ध होणार असल्याने समिटचा लाभ घेण्यासाठी उद्योजकांनी एकच गर्दी केली आहे. नवीन कलाविष्कारांचे ५० स्टॉल्सही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

उद्‌घाटन सोहळ्यास उद्योग सहसंचालक लक्ष्मण शेळके, जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक संदीप पाटील, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कार्यकारी अभियंता नितीन हरगुडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी लिबांजी भड, कामगार उपायुक्त विकास माळी, निमा उपाध्यक्ष आशिष नहार, राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, सहसचिव मनीष रावल, कैलास पाटील, विरल ठक्कर, नितीन आव्हाड, राजेंद्र कोठावदे, चंद्रशेखर सिंग, स्टार्टअप समितीचे समन्वयक श्रीकांत पाटील, आयमाचे अध्यक्ष ललित बूब, सचिव प्रमोद वाघ, वरुण तलवार, आदींसह सुमारे २५० हुन अधिक उद्योजक व स्टार्टअप व महिला उद्योजिका ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

District Collector Jalaj Sharma while inaugurating the Startup Summit at NIMA Complex on Thursday. dignitaries with
Nashik News : शवपेटी मृत्युशय्येवर तर स्मशानभुमी धुळीत! अखेरचा प्रवास समस्यांच्या गर्तेतूनच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.