Nashik News : फेब्रुवारीतच तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्याने भविष्यात शहरात १५ ते २० टक्के पाणी कपात करण्याचे संकेत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बुधवारी दिलेत. तूर्त शहराची पाणी कपात टळली आहे. दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे हे गुरुवारी (ता.२२) आढावा बैठक घेणार आहेत. जिल्हाधिकारी शर्मा यांनी बुधवारी (ता.२१) जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक घेतली. (Nashik Collector Jalaj Sharma statement on water cut marathi news)
जिल्ह्यातील लहान-मोठ्या धरणांमध्ये सध्या २९ हजार ६५ दशलक्ष घनफूट म्हणजे ४४ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २३ टक्क्यांनी कमी आहे. शेकडो गाव व वाड्यांमध्ये फेब्रुवारीत टँकरने पाणी द्यावे लागत आहे. पाण्याचा सर्वांनी काटेकोरपणे वापर करून बचत करावी. नियोजनात पाण्याची गरज कमी होणार असल्यास त्याची कल्पना प्रशासनाला द्यावी असे बैठकीत विविध शासकीय यंत्रणांना सांगण्यात आले.
शहराला पुरेल इतका साठा
नाशिक शहरात तुर्तास पाण्याचा तुटवडा नाही. त्यामुळे कपातीची सध्या गरज नाही. आरक्षण करताना मनपाला सूचना दिली गेली होती. पुढील काळात स्थिती पाहून गरज वाटल्यास याबाबत योग्यवेळी निर्णय घेतला जाईल. महापालिकेला धरणातून मृतसाठा उचलण्यासाठी व्यवस्था करण्याची सूचना केलेली आहे.
ती व्यवस्था झाल्यास शहराला अतिरिक्त ४०० दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध होईल. आवश्यकता भासल्यास पुढील काळात १० ते २० टक्के कपात करायची हे अद्याप निश्चित नाही. कदाचित तशी गरज भासणार नाही, असे शर्मा यांनी सूचित केले.
लोकप्रतिनिधींना धास्ती
आगामी लोकसभा निवडणुकीत कपातीमुळे नागरिक नाराज होतील या धास्तीने हा निर्णय घेणे टाळले जात असल्याची चर्चा आहे. या विषयावर पालकमंत्र्यांशी चर्चा करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. उपलब्ध जलसाठ्यात प्राधान्याने पिण्यासाठी पाणी उपलब्ध केले जाईल. नंतर शेती व औद्योगिक या क्रमानुसार नियोजन झालेले आहे. पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही. ( latest marathi news )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.