Nashik News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शस्त्रास्त्रे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामीण भागातील ९४१ परवानेधारक असून त्यांच्याकडील ९७९ शस्त्रांपैकी २२१ शस्त्र जमा करण्यात येणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा विषय लक्षात घेऊन शहर आणि ग्रामीण भागात परवाना शस्त्रधारकांची शस्त्रे जमा करण्याचे आदेश आहेत. (Nashik Collector orders to 221 weapons in district will be deposited with police marathi news )
यात नाशिकच्या ग्रामीण भागात ९४१ शस्त्र परवानाधारक असून त्यांच्याकडे ९७९ शस्त्रे आहेत. हे सर्व शस्त्र फायर आर्मच्या कक्षेत मोडतात. आचारसंहिता संपेपर्यंत ही शस्त्रेही पोलिसांकडे जमा करावी लागतात. आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, यादृष्टीने शहरात पोलिस आयुक्तांनी व ग्रामीण भागात जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांनी तसे आदेश जारी केले आहेत. आचारसंहिता संपेपर्यंत शस्त्र परवानाधारकांना शस्त्रे वाहून नेण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करील तो इसम तथा परवानाधारक दंडनीय कारवाईस पात्र ठरेल, असे पोलिस विभागाने स्पष्ट केले आहे.
उर्वरित शस्त्रास्त्रांचे काय?
एखादा समाज दीर्घकालीन स्थायी कायदा, रूढी व परंपरेने शस्त्रास्त्रे बाळगण्यास हकदार आहे, त्यांना हा आदेश लागू होणार नाही. अशा समाजातील व्यक्ती हिंसाचारात सहभागी असल्याचे आढळून आल्यास आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यास अडचण निर्माण करीत असल्याचे आढळल्यास, निवडणूक शांततेच्या मार्गाने पार पाडण्यास अडथळा निर्माण करीत असल्याचे आढळल्यास त्यांची शस्त्रास्त्रे पोलिस तत्काळ जमा करणार आहेत. शस्त्रे जमा करण्यापासून सूट मिळण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यामार्फत पुनर्विलोकन समितीकडे अर्ज करण्याची परवाना धारकांना मुभा आहे.(Latest Marathi News)
यांची शस्त्रास्त्रे झाली जमा
- जामिनावर मुक्त झालेल्या व्यक्ती
- गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती
- निवडणूक कालावधीत दंगलीत समावेश असलेल्या व्यक्ती
तालुकानिहाय जमा झालेले शस्त्रे
कळवण : ०५
मालेगाव : ३२
सुरगाणा : २३
चांदवड : ०८
देवळा : ०६
दिंडोरी : ११
इगतपुरी : २३
निफाड : ३७
नांदगाव : १०
नाशिक : ०२
पेठ : ०५
सटाणा : ०२
सिन्नर : १५
येवला : २४
त्र्यंबकेश्वर: १८
एकूण २२१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.