Nashik News : कलानिकेतनने शहराचा सांस्कृतिक गौरव उज्जवल करावा : जिल्हाधिकारी शर्मा

Nashik News : चित्रकलेच्या माध्यमातून अनेक चित्रकारांनी नाशिकचे दस्तावेजीकरण केले आहे. तो अनमोल ठेवा असून नाशिकचे ऐतिहासिक, भौगोलिक व सांस्कृतिक महत्त्व त्यातून स्पष्ट होते.
Collector Jalaj Sharma while inspecting the art gallery of Kalaniketan Sanchalit Painting College.
Collector Jalaj Sharma while inspecting the art gallery of Kalaniketan Sanchalit Painting College.esakal
Updated on

Nashik News : चित्रकलेच्या माध्यमातून अनेक चित्रकारांनी नाशिकचे दस्तावेजीकरण केले आहे. तो अनमोल ठेवा असून नाशिकचे ऐतिहासिक, भौगोलिक व सांस्कृतिक महत्त्व त्यातून स्पष्ट होते. चित्रकला महाविद्यालयात उत्तम कलासंस्कार केले जातात हे प्रत्यक्ष बघून समाधान वाटले. नाशिक कलानिकेतनचे पदाधिकारी. (Collector Sharma statement Kalaniketan should brighten city cultural glory)

चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी हे कलावैभव वाढवावे. नाशिकचा सांस्कृतिक गौरव उज्वल करावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. प्रख्यात चित्रकार कलामहर्षी वा. गो. कुलकर्णी स्थापित नाशिक कलानिकेतन ही संस्था गेली ८४ वर्षे कलाक्षेत्रासाठी सातत्याने निस्वार्थ कार्य करीत आहे.

चित्रकला महाविद्यालयाच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध कलेचे शिक्षण देण्यात‌‌ येते. देश-विदेशामध्ये सुद्धा संस्थेचे विद्यार्थी चांगले, नामवंत चित्रकार म्हणून कार्य करत आहे. मंगळवारी (ता.२३) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नाशिक कलानिकेतन संचलित चित्रकला महाविद्यालयास भेट देत येतील कामाकाज जाणून घेत कलादालनामधील अनमोल चित्रसंगह पाहत जतन केलेल्या चित्रसंग्रहाचे, विविध कलाकृतींचे त्यांनी भरभरून कौतुक केले.

सर्व कलावर्गांची पाहणी केली. विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल वाढवले. आपल्या महाविद्यालयीन जीवनातल्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गेल्या ८४ वर्षीपासून कलाक्षेत्रासाठी सातत्याने निःस्वार्थपणे कार्य करत आहे. चित्रकला महाविद्यालयाच्या माध्यमांतून शास्त्रशुद्ध कलेचे शिक्षण दिले जात असून उत्तम पिढी घडविली जात आहे. (latest marathi news)

Collector Jalaj Sharma while inspecting the art gallery of Kalaniketan Sanchalit Painting College.
Nashik Monsoon : पश्चिम पट्ट्यातील पावसामुळे म्हाळुंगी नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर वाढ

पण या जुन्या संस्थेची सद्यःस्थितीत हुंडीवाला लेनमधील जागा अपुरी पडत असून अनेक अडचणींचा सामोरे जावे लागत आहे. महाविद्यालयास नवी जागा मिळाली तर ज्ञानदानाचे हे काम अधिक जोमाने सुरु राहील, अशी आग्रही मागणी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

यावेळी नाशिक कलानिकेतनचे अध्यक्ष ॲड. अविनाश भिडे, उपाध्यक्ष प्रा. संध्या केळकर, सचिव प्रा. दिनकर जानमाळी, सहसचिव नूतन ढिकले, कोषाध्यक्ष उदय बिरारी, रामदास महाले, प्रवीण बुरकुले, आनंद दहिफळे, सुनील धोपावकर, उत्तम उगले, सुधीर शिंगणे, सुरेश भावसार आदींसह कर्मचारी, विद्यार्थी, नामवंत चित्रकार उपस्थित होते.

Collector Jalaj Sharma while inspecting the art gallery of Kalaniketan Sanchalit Painting College.
Nashik Police : सहा महिन्यात 174 गोवंशांची सुटका! आयुक्तालय हद्दीत 54 गुन्हे दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.