Nashik News : शासन योजना तृतीयपंथीयांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील : जिल्हाधिकारी शर्मा

शासनाच्या विविध कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.
Collector Jalaj Sharma at the inauguration of the reserved room for tertiary care in the district hospital. Neighboring Zilla Parishad Chief Executive Officer Ashima Mittal,
Collector Jalaj Sharma at the inauguration of the reserved room for tertiary care in the district hospital. Neighboring Zilla Parishad Chief Executive Officer Ashima Mittal,esakal
Updated on

Nashik News : तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्याकामी आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. जिल्हा रुग्णालयात गुरूवारी (ता.२५) तृतीयपंथीयांसाठी राखीव कक्षाचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आरोग्य विभागचे उपसंचालक डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, तसेच, तृतीयपंथी समाजाच्या गुरु सलमा शिखा, विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. (Efforts are being made to reach government schemes to third parties)

त्यावेळी ते बोलत होते. आगामी सार्वजनिक लोकसभा निवडणुकीत सर्वांनी मतदानाचे पवित्र कर्तव्य बजविण्यासाठी आग्रही भूमिका मांडली. तृतीयपंथीयांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत बऱ्याच काळापासून प्रलंबित मागणी पूर्ण झाल्याचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले. तृतीयपंथीयांसाठी राखीव कक्षाची माहिती जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचवून शासकीय आरोग्य संस्थांमध्ये त्यांनी उपचार घ्यावेत व आजारपणाजासाठी खासगी रुग्णालयात येणारा अतिरीक्त खर्च टाळावा, असे आवाहन आशीमा मित्तल यांनी केले. (latest marathi news)

Collector Jalaj Sharma at the inauguration of the reserved room for tertiary care in the district hospital. Neighboring Zilla Parishad Chief Executive Officer Ashima Mittal,
Nashik News : शवपेटी मृत्युशय्येवर तर स्मशानभुमी धुळीत! अखेरचा प्रवास समस्यांच्या गर्तेतूनच

डॉ. चारुदत्त शिंदे म्हणाले, राज्यात सर्व प्रथम तृतीयपंथीयांसाठी आरक्षित कक्ष जिल्हा रुग्णालयाने सुरू केला आहे. या कक्षात अद्ययावत अशा १० खाटा असून, जीवरक्षक प्रणाली, आवश्यक यंत्रे व उपकरणे आहेत. येथे दाखल होणाऱ्या सर्व रुग्णांवर मोफत निदान, विनामूल्य शस्त्रक्रिया, रक्त तपासण्या व उपचार करण्यात येणार आहेत.

उपरोक्त कक्षासाठी सहा प्रकारच्या विशेषज्ज्ञ सुविधा, परिचारिका सेवा नियोजित करण्यात आल्या आहेत. डॉ. अनंत पवार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निलेश पाटील, डॉ. प्रवीण बोरा, अधिसेविका भालेराव, वाघ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, अधिपरिचारीकांनी परिश्रम घेतले.

Collector Jalaj Sharma at the inauguration of the reserved room for tertiary care in the district hospital. Neighboring Zilla Parishad Chief Executive Officer Ashima Mittal,
Nashik Onion News : माथाडी कामगारांचे आंदोलन सुरूच! सटाणा बाजार समितीत दुपारनंतर लिलाव नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.