नाशिक : उमेदवारांना अर्जासोबत आपली संपत्तीही जाहीर करावी लागणार असल्याने त्यांच्याकडील सोन्याची अचूक माहिती द्यावी लागणार आहे. बाजार भावाप्रमाणे त्याचे मूल्य निवडणूक निर्णय अधिकारी ठरवणार आहेत. त्यामुळे संपत्तीची माहिती देताना उमेदवारांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. (Nashik Collector will determine value of gold of candidates One person can fill only four applications)
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. शुक्रवार (ता.२६) पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा व उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी सोमवारी (ता.२२) जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वपक्षीय नेत्यांना याविषयी माहिती दिली.
एक व्यक्ती जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो. तसेच एका व्यक्तीला दोन लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहे. अर्जातील सर्व रकाने भरणे बंधनकारक आहे. ज्या बाबी लागू होत नाहीत, त्या ठिकाणी ‘लागू नाही’ असे लिहिणे बंधनकारक असणार आहे.
अन्यथा उमेदवारी अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. उमेदवाराने शपथपत्रामध्ये गुन्ह्यांबाबत, मालमत्ता देणी, शैक्षणिक अर्हतासोबत त्यांचे सोशल मीडियावरील अकाउंटची माहिती भरणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. उमेदवारी अर्जासोबत अनामत रक्कम रुपये २५ हजार व अनुसूचित जातीचा किंवा जमातीचा उमेदवार असल्यास साडेबारा हजार रुपये द्यावे लागतात. (latest marathi news)
उमेदवारांनी अर्ज सादर करताना स्वत:च्या नावे असलेल्या बँकेचा तपशील सादर करून या बँक खात्यातूनच उमेदवाराने निवडणूक विषयक खर्च करणे बंधनकारक राहील. नामनिर्देशन पत्रासोबत निवडणूक आयोगाचे आदेशानुसार विहित प्रपत्रातील प्रपत्र २६ चे शपथपत्र शपथबद्ध करणे आवश्यक आहे. शपथपत्रातील सर्व रकाने भरणे आवश्यक असून, कोणताही रकाना रिक्त ठेवू नये, अशा सूचना करण्यात आल्या.
मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा
उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मतदानाच्या दृष्टीने आरोग्य व्यवस्थेचे आव्हान मोठे आहे. प्रत्येक बुथनिहाय आरोग्य व्यवस्था, पिण्याचे पाणी या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालय व महापालिका यांनी योग्य समन्वयातून आपली भूमिका पार पाडावी. बुथनिहाय प्रथमोपचार, रुग्णवाहिका, आरोग्य यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.