Divisional Commissioner : विद्यार्थी आरोग्य तपासणीची आदर्श कार्यप्रणाली करावी; आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी घेतली बैठक

Nashik News : जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची वर्षातून दोनदा आरोग्य तपासणी करण्यात यावी, त्याबाबत आराखडा तयार करण्याचे निर्देश दिल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले होते.
Commissioner Praveen Gedam
Commissioner Praveen Gedamesakal
Updated on

Nashik News : जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची वर्षातून दोनदा आरोग्य तपासणी करण्यात यावी, त्याबाबत आराखडा तयार करण्याचे निर्देश दिल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आरोग्य, जिल्हा परिषद शिक्षण विभागाला दिले होते. गुरुवारी (ता. २५) डॉ. गेडाम यांनी पुन्हा बैठक घेत, एकही गरजवंत विद्यार्थी उपचाराविना राहू नये, त्याबाबतची आदर्श कार्यप्रणाली विकसित करण्यात यावी. (Nashik Divisional Commissioner)

तसेच, बालकांच्या आरोग्याचा सर्व डाटा एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकेल, यासाठी एका नवीन सॉफ्टवेअरची निर्मिती करण्याचे निर्देश डॉ. गेडाम यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांसह जिल्हा आरोग्य विभागास दिले. डॉ. गेडाम यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेत आरोग्य व शिक्षण विभागाची एकत्रित आढावा बैठक झाली. बैठकीस प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे.

प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आदी उपस्थित होते. डॉ. गेडाम यांनी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शालेय आरोग्य तपासणीबाबतची सर्व प्रक्रिया, त्याबाबतच्या माहितीचे संकलन आणि संबंधित प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली. जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या आरोग्याची माहिती ही सध्या केवळ कागद आणि कार्ड स्वरूपात उपलब्ध आहे.

मात्र, ती माहिती सर्व संबंधितांना तसेच यंत्रणेतील प्रमुखांनाही एकाच वेळी सहजपणे पाहायला मिळावी, या दृष्टीने माहितीचे संकलन डिजिटायजेशन करून नवीन सॉफ्टवेअर निर्माण करण्याचे आदेश डॉ. गेडाम यांनी दिले. त्यामुळे विद्यार्थ्याच्या आरोग्याची माहिती एका क्लिकवर मिळणे शक्य होणार असून, त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबतची दक्षता घेणाऱ्या पालकांपासून शिक्षक, तपासणी करणारे डॉक्टर, उपचार करणारे डॉक्टर, तसेच जिल्हा स्तरावरील यंत्रणेच्या प्रमुखांनाही एका क्षणात आणि एकाच वेळी मिळू शकणार आहे. (latest marathi news)

Commissioner Praveen Gedam
Nashik District : ‘कलेक्टोरेट’च्या वैभवशाली 155 वर्षांचा विसर; जिल्ह्याला लाभले 105 जिल्हाधिकारी

सॉफ्टवेअरचा असा होईल फायदा

जि. प.च्या आरोग्य विभागाने गत वर्षापासून प्रत्येक विद्यार्थ्याचे हेल्थ कार्ड बनविले आहे. त्याचा उपयोग हे सॉफ्टवेअर करताना होणार असून, सर्व डाटा एकत्रितरित्या संकलित करून तो डाटा सॉफ्टवेअरमध्ये फिड करून तालुकानिहाय, शाळानिहाय, विद्यार्थीनिहाय सर्व माहिती एका क्लिकवर मिळू शकणार आहे.

विद्यार्थ्यावर अवघड शस्त्रक्रिया असेल किंवा उपचार करावयाचे असल्यास त्याची माहिती सॉफ्टवेअरवर उपलब्ध असल्यास संबंधित विद्यार्थी, पालक, शाळेचे शिक्षक, स्थानिक आरोग्य कर्मचारी या सर्वांच्या माध्यमातून त्याबाबत दक्षता बाळगून तो पूर्णपणे बरा करता येणार आहे.

उत्तर महाराष्ट्रात ठरेल उपयोगी

प्रारंभिक तपासणीपासूनची आदर्श कार्यपद्धती विकसित करून त्यातून तो विद्यार्थी आजारातून पूर्णपणे बरा होईपर्यंतच्या सर्व बाबींच्या नोंदीही त्या सॉफ्टवेअरमध्ये असाव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिले. तयार करण्यात आलेल्या आराखड्यावर चर्चा झाली. पायलट प्रोजेक्ट म्हणून नाशिकमध्ये तयार केले जाणारे सॉफ्टवेअर हे भविष्यात उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांसाठीही वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Commissioner Praveen Gedam
Nashik News : सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.