Nashik Police : दोन दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. शहर पोलिसांनी सुमारे ६२२ सराईत गुन्हेगार व टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. (Nashik Commissioner of Police action against goons)