Nashik Committee Election : महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत चर्चा सुरू

Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadiesakal
Updated on

Nashik Committee Election : नाशिक समिती निवडणूक चांगलीच रंगतदार होणार, असे चित्र निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि माजी सभापती देविदास पिंगळे यांच्यात मंगळवारी (ता. ११) बैठक झाली.

यात जागा वाटपाबाबत चर्चा झाली असून, काही जागांवर एकमत झाले आहे. पुढील बैठकीत ठोस निर्णय होणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल यांनी दिली. (Nashik Committee Election discussion about seat allocation in Mahavikas Aghadi started nashik news)

नाशिक बाजार समिती निवडणुकीत आजी-माजी खासदार नव्हे तर महाविकास आघाडी व भाजप शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट लढत होणार आहे. यासाठी दोन्ही पॅनलकडून जोरदार तयारी सुरू आहे.

शिवसेना ठाकरे गट आणि माजी खासदार तथा माजी सभापती देवीदास पिंगळे यांची निवडणूक संदर्भात बैठक झाली. यात ठाकरे गटाकडून काही जागांची मागणी करण्यात आली. त्यात काही जागांवर एकमत झाले, परंतु काही जागांवर मात्र चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Mahavikas Aghadi
Poultry Workshop : जाणून घ्या करार पद्धतीने गावरान अंडी कुक्कुटपालन, व्यवसाय संधी!

पूर्ण पॅनल कशा निवडून येईल, कोणत्या जागेवर कोणता उमेदवार द्यायचा याविषयी विचार विनिमय करण्यात आला. बैठकीस उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार वसंत गिते, विनायक पांडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अद्याप नाही एकही माघार

बुधवारी (ता.५) छाननीत १३७ उमेदवारी अर्ज वैध ठरले. देविदास पिंगळे यांच्या अर्जाचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांच्या कोर्टात आहे. त्यावर अद्याप निर्णय नाही. त्यामुळे मंगळवारपर्यंत एकही अर्ज माघारी झाला नाही. २० एप्रिलपर्यंत किती उमेदवार अर्ज माघारी घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Mahavikas Aghadi
Nashik News : ZPच्या 15 हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले; वेतन कपातींच्या निर्णयांचा संभ्रमाचा परिणाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.