नाशिक : लोकसभा निवडणुकीत महायुतीतील भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या शिंदे गटाला कमी खासदार देऊन मतदारांनी जमिनीवर आणल्यानंतर विधानसभा निवडणुकीत ताकही फुंकून पिणाऱ्या महायुतीने महिला वर्गासाठी लाडकी बहीण योजना आणली खरी मात्र जिल्ह्यात लाडक्या बहिणी रुसलेल्याच दिसून आल्या. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सर्वच्या सर्व १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिला मतदानाचे प्रमाण घटले.