Nashik Potholes : सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत असलेल्या राज्य महामार्ग व जिल्हा रस्त्यावरील खड्ड्यांची तक्रार अँड्रॉइड ॲपच्या माध्यमातून करता येणार आहे. ॲपच्या माध्यमातून तक्रार दाखल झाल्यानंतर क्षेत्रीय कार्यालय खड्डे दुरुस्त करतील आणि ७२ तासांच्या आत अँड्रॉइड ॲपद्वारेच उत्तर देण्यात येईल. अशा प्रकारची खड्डे तक्रार निवारण प्रणाली (पीसीआरएस) विकसित करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे संपूर्ण राज्यभरात १ लाख १८ हजार किलोमीटर पेक्षा जास्त रस्त्यांचे जाळे निर्माण झालेले आहे. (Complain about road potholes through app PCRS Complaint Redressal System )