Nashik News : खासदार संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात तक्रार

Nashik News : खासदार संजय राऊत यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत दफन करण्याची दिलेली धमकी ही प्रक्षोभक, बेजबाबदार, सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे.
Sanjay Raut
Sanjay Raut esakal
Updated on

Nashik News : शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत दफन करण्याची दिलेली धमकी ही प्रक्षोभक, बेजबाबदार, सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे. या संदर्भात राऊत यांच्याविरोधात अंबड पोलिस ठाण्यात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी तक्रार अर्ज दिला आहे. (Complaint against MP Sanjay Raut for making controversial statement)

खासदार राऊत यांनी त्यांच्या भाषणात पंतप्रधान मोदी आणि औरंगजेब यांच्यात त्यांच्या जन्मस्थानावर आधारित ऐतिहासिक समांतरे काढण्याचा प्रयत्न दिशाभूल करणारा आणि फूट पाडणारा आहे. अशा वक्तव्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची आणि निवडणुकांच्या शांततेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

राऊत यांचे पंतप्रधानांच्या विरोधातील विधान मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांच्या तत्त्वाच्या विरोधात आहे, हे उघड आहे. (latest marathi news)

Sanjay Raut
Nashik Lok Sabha Constituency : गोडसे, वाजे, डॉ. पवार, भगरेंच्या खर्चात तफावत; खर्च फेरसादर करण्याची नोटीस

या प्रकरणावर त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक असल्याचा तक्रार अर्ज त्यांनी अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्याकडे दिला आहे.

या वेळी जगन पाटील, अविनाश पाटील, रवींद्र पाटील, प्रवीण मोरे, प्रकाश चकोर, यशवंत नेरकर, श्री. रजपूत, दिनेश मोडक आदी उपस्थित होते.

Sanjay Raut
Nashik Loksabha मध्ये भुजबळ फॅक्टर निवडणुकीत किती महत्वाचा ठरणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.