Nashik : महिला अत्याचारांच्या तक्रारींची दखल घ्यावी; शिवसेनेच्या (उबाठा) महिला उपनेत्यांचे पोलिस उपायुक्तांना निवेदन

Latest Marathi News : राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, महिला अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.
Visakha Raut, Sheetal Devrukhkar, Rita Wagh, MLA Rituja Latke, Adv. Ekta Khair.
Visakha Raut, Sheetal Devrukhkar, Rita Wagh, MLA Rituja Latke, Adv. Ekta Khair.esakal
Updated on

नाशिक : राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, महिला अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पोलिसांकडून गुन्हे नोंदविण्यास टाळाटाळ केली जाते. तरी, महिला अत्याचारांबाबतच्या गंभीर गुन्ह्यांची तातडीने दाखल घ्यावी. तक्रारी दाखल करण्याचे आदेश स्थानिक पोलीस ठाण्यांना द्यावेत, या मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गटातर्फे पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांना देण्यात आले. (Complaints of women abuse should be taken into consideration Statement of Shiv Sena women )

निवेदनानुसार, बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील भवानी पेठेतील शाळेत अल्पवयीन मुलीवर स्वच्छतागृहात नेत अत्याचार केले. याप्रमाणे, अकोला जिल्ह्यातील काझीखेड, नवी मुंबईतील कोपरखैराणे व उरण येथेही अशा घटना घडल्या आहेत. महिला अत्याचाराच्या अशा गंभीर गुन्ह्यांत स्थानिक पोलिस ठाण्यांकडून गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली जाते.

Visakha Raut, Sheetal Devrukhkar, Rita Wagh, MLA Rituja Latke, Adv. Ekta Khair.
Nashik Accident : शिर्डी महामार्गावर अज्ञात वाहनाचा धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

राज्यात दर तासाला महिला अत्याचाराच्या ५ घटना घडतात. २०२३ मध्ये राज्यात बलात्काराच्या ७५२१, अपहरणाच्या ९६९८, हुंडाबळीच्या १६९, नातलगांकडून त्रासाच्या ११२२६ तर विनयभंग व लैंगिक अत्याचाराच्या १७२८१ घटना घडल्या आहेत. तर मुंबईत मे २०२४ अखेर बाललैंगिक अत्याचारासंदर्भात ५०९ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सदरची आकडेवारी चिंताजनक असून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

महिला अत्याचारांच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद घेऊन त्वरित तक्रारी दाखल करण्याचे आदेश स्थानिक पोलिस ठाण्यांना देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या विशाखा राऊत, प्रियंका चतुर्वेदी, शीतल देवरुखकर, रिटा वाघ, आ. ऋतुजा लटके, ॲड. एकता खैरे यांच्या शिष्टमंडळाने पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांची भेट घेतली.

Visakha Raut, Sheetal Devrukhkar, Rita Wagh, MLA Rituja Latke, Adv. Ekta Khair.
Nashik : वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी उचलले टोकाचे पाऊल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.