Nashik News : चंदन लाकूड प्रकरणाबाबत परस्परविरोधी दाव्यांमुळे संभ्रम! संशयिताच्या परवान्यासह डेपो जुना

Latest Nashik News : छापा टाकल्यानंतर संशयित आरोपीने वन विभागाचा रीतसर वाहतुकीचा परवाना असल्याची कागदपत्रे सादर केली. त्यामुळे या प्रकरणाबद्दल अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे.
Sandalwood seized by Forest Department in action
Sandalwood seized by Forest Department in actionesakal
Updated on

Nashik News : म्हसरुळ येथे वन विभागाने जप्त केलेले चंदन लाकूड प्रकरणाचा तपास अजूनही योग्य दिशेने गेलेला दिसत नाही. छापा टाकल्यानंतर संशयित आरोपीने वन विभागाचा रीतसर वाहतुकीचा परवाना असल्याची कागदपत्रे सादर केली. त्यामुळे या प्रकरणाबद्दल अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे. (Confusion due to conflicting claims regarding sandalwood case)

वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी गोपाल शर्मा याने जो परवाना वनविभागाकडे दाखविला तो २०१६-१७ सालचा आहे. असा एक परवाना काढून त्यावर अनेकवेळा तस्करीची मोडस ऑपरेंडी वापरली जाते. कारण परवान्यामध्ये किती घनमीटर लाकूड वाहतूक केली पाहिजे, असे निर्देशित केलेले असते.

मात्र जुनाच कागद दाखवून अशाप्रकारे तस्करी करण्याचे प्रकार यापूर्वीही उघडकीस आलेले आहेत. तसेच डेपोचा परवाना हा सीसीएफ स्तरावरून दिला जातो. त्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. मात्र संबंधित डेपोचे नूतनीकरण झालेले नाही. (latest marathi news)

Sandalwood seized by Forest Department in action
Nashik: पिंपरवाडी टोलनाक्यावर आंदोलन चिघळले! NHAIचे दुर्लक्ष, वेलजाळींचे 2 दिवसांपासून धरणे; चर्चेसाठी खासगी एजन्सीचे प्रतिनिधी

त्यामुळे दाखल केलेला गुन्हा हा योग्य असल्याचे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. संशयिताने जे परवान्याचे कागदपत्रे वनविभागाकडे सादर केली आहेत, त्याच्या योग्य तपासणीसाठी काही कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले.

तपास गुलदस्त्यात

मुख्य वनसंरक्षक यांच्या बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड चोरीला गेले. त्याचा शोध घेताना झालेल्या कारवाईत म्हसरुळ येथील चंदनसाठा आढळला. मात्र त्यामध्येही चोरी झालेले चंदनाचे झाडाचे लाकूड नव्हते. त्यामुळे मुख्य वनसंरक्षकाच्या बंगल्यातील चंदनाच्या झाडाच्या चोरीचे तपासाचे काय झाले, हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीतच आहे.

Sandalwood seized by Forest Department in action
Nagpur Crime: अरोली ठाण्याच्या हद्दीत नेमके चालले तरी काय? अवैध धंद्यात कमालीची वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.