Nashik Traffic Problem : शरणपूर रोड ‘वन-वे’वर दुहेरी वाहतुकीमुळे कोंडी; फलक लावूनही वाहनचालकांकडून सर्रास घुसखोरी

Traffic Problem : मेळा बसस्थानक ते टिळकवाडी सिग्नल हा रस्ता स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मॉडेल रोड केला जात आहे.
As the work of smart road is going on on Sharanpur Road, one way route has been made. .
As the work of smart road is going on on Sharanpur Road, one way route has been made. .esakal
Updated on

Nashik Traffic Problem : मेळा बसस्थानक ते टिळकवाडी सिग्नल हा रस्ता स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मॉडेल रोड केला जात आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आलेली असतानाही यावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊन अनेकांना ‘ट्रॅफिक जाम’चा फटका बसतो आहे. विशेषत: याच रस्त्यावर हॉस्पिटल असल्याने रुग्णांचीही गैरसोय या वाहतुकीमुळे होते आहे. ( Congestion due to double traffic on Sharanpur Road one way )

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील रस्त्यांचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सुरू आहे. त्याअंतर्गतच मेळा बसस्थानक ते टिळकवाडी या रस्त्याचे काम महिन्यापासून सुरू करण्यात आले आहे. ततपूर्वी शहर वाहतूक विभागाने अधिसूचना जारी करीत या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. मेळा बसस्थानकाकडून टिळकवाडीकडे जाणारा मार्ग वाहतूकीसाठी बंद केला असून, केवळ टिळकवाडीकडून सीबीएसकडे येणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला ठेवला आहे.

तसे फलकही रस्त्याच्या दोन्ही बाजुला बॅरिकेटींग करून त्यावर लावण्यात आलेले आहे. असे असतानाही, या एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे बहुतांशवेळा या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते आहे. अनेकदा तर, टिळकवाडी सिग्नलकडून परिवहन महामंडळाच्या बसेसही याच मार्गे जुने सिबीएसकडे येतात. अशावेळी मात्र वाहतुकीची मोठी कोंडी होते आहे. यामुळे अनेकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे. (latest marathi news)

As the work of smart road is going on on Sharanpur Road, one way route has been made. .
Nashik Traffic Problem : शालिमार चौकास अतिक्रमणधारकांचा गराडा; रिक्षाचालकांची सर्रास मनमानी

अंमलदार बेपत्ता

या रस्त्याचे काम सुरू झाले, तेव्हापासून मेळा बसस्थानक येथे वाहतूक पोलीस अंमलदाराची याठिकाणी नेमणूक केली होती. परंतु सुरुवातीला नियमित असणारे अंमलदार गेल्या काही आठवड्यांपासून नाहीत. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांचे फावते आहे. याठिकाणी एकेरी वाहतुकीसंदर्भात फलकही लावण्यात आला आहे. परंतु त्याला न जुमानता वाहनचालक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. यात दुचाकी, रिक्षाचालक आणि कारचालकांचा समावेश अधिक आहे.

रुग्णांची गैरसोय

या रस्त्यावर पोलीस पेट्रोल पंपासमोर हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलसमोरील रस्त्याचेच काम सुरू असल्याने रुग्णांना घेऊन येणारी वाहने, रुग्णवाहिका या पेट्रोल पंपासमोर थांबतात आणि रुग्णांना उतरवून स्ट्रेचर वा व्हिलचेअरने नेले जाते. परंतु ते वाहन थांबलेले असेपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. यातून वादावादीचेही प्रसंग होतात. या रुग्णांची गैरसोय होत असून, एकेरी वाहतूकीचे पालन केल्यास रुग्णांची होणारी गैरसोय टाळता येणार आहे.

As the work of smart road is going on on Sharanpur Road, one way route has been made. .
Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.