Nashik Congress: जिल्ह्यातील 8 मतदारसंघावर काँग्रेसचा दावा! प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मागविले जिल्हा काँग्रेसकडे अहवाल

Political News : प्रदेश काँग्रेसकडून विधानसभेच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी पक्षाने राज्यातील २८८ विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून येत्या १० ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले आहे.
While discussing with State President Nana Patole, District President Shirish Kotwal, Anil Aher, Shivaji Kasav along with District Officers were present.
While discussing with State President Nana Patole, District President Shirish Kotwal, Anil Aher, Shivaji Kasav along with District Officers were present.esakal
Updated on

Nashik Congress : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाने २८८ विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. प्रदेश काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक लढू इच्छिणाऱ्या काँग्रेस पक्षातील उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत. नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघातून आतापर्यंत अंदाजे ५५ उमेदवारांकडून अर्ज दाखल झाले आहे.

यातही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शहरातील नाशिक मध्य, नाशिक पूर्व तर, ग्रामीण भागातील चांदवड-देवळा, त्र्यंबकेश्वर-इगतपुरी, बागलाण, नांदगाव, मालेगाव मध्य, मालेगाव बाहय या मतदारसंघाचे अहवाल जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांच्याकडे मागविले आहेत. त्यामुळे एकप्रकारे काँग्रेसने या विधानसभा मतदारसंघावर दावा केल्याचे बोलले जात आहे. (Nashik Congress claims 8 constituencies in district)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.