Nashik News : आमदार खोसकर नेमके कोणीकडे? राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पवारांकडून उल्लेख

Nashik News : कॉंग्रेसचे आमदार हिरामण खोसकर कॉंग्रेसच्या पंजा निशाणीवर निवडून आले असले तरी त्यांना घड्याळाचीच टकटक अधिक ऐकू गेल्याचे वांरवार दिसून आले.
Congress MLA Hiraman Khoskar
Congress MLA Hiraman Khoskaresakal
Updated on

Nashik News : इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे आमदार हिरामण खोसकर कॉंग्रेसच्या पंजा निशाणीवर निवडून आले असले तरी त्यांना घड्याळाचीच टकटक अधिक ऐकू गेल्याचे वांरवार दिसून आले. त्यामुळे खोसकर नेमके कुठल्या पक्षाचे असा सवाल आता मतदार विचारू लागले आहेत. (Congress MLA Hiraman Khoskar)

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत अर्थमंत्री अजित पवार यांनी खोसकर यांचा उल्लेख करून ते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट केल्याने खोसकरांच्या भूमिकेविषयी संशय अधिक दाटला आहे. लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत जिल्ह्यातील राजकारण टोकाला गेल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचा अध्याय सुरू झाला आहे.

या अध्यायाचा पहिला अंक नाशिक जिल्ह्यापासून सुरू झाला आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांची भूमिका नक्की कुठल्या पक्षाकडे यावरून वादाची ठिणगी पडताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक मुंबईत गरवारे क्लब येथे पार पडली.

या बैठकीत नाशिकच्या विषयाला हात घालताना पक्षाचे अध्यक्ष व अर्थमंत्री अजित पवार यांनी खोसकर यांच्या नावाचा उल्लेख केला. नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला हवी होती, तसे नियोजनदेखील झाले. आपले आमदार कोकाटे, अहिरे यांचे नाव घेताना हिरामण खोसकर यांचा उल्लेख देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून केला. त्यामुळे खोसकर हे चर्चेत आले आहे. (latest marathi news)

Congress MLA Hiraman Khoskar
Nashik Lok Sabha Constituency : पूर्वमधून महायुतीला लीड; पश्चिम, मध्यकडे लक्ष

यापूर्वी देखील खोसकर यांना काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार म्हणूनच अधिक ओळखले जाते. मध्यंतरी आमदारांच्या पळवापळवीमध्ये खोसकर यांचे नाव देखील घेतले जात होते मात्र कालांतराने त्यांनी नकार दिल्याने वादावर पडदा पडला. आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना त्याची सुरुवात इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून झाली आहे.

खोसकर यांची भूमिका संशयास्पद

हिरामण खोसकर हे काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणूनच त्यांच्याकडे आतापर्यंत पाहिले गेले. लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मतदारसंघाची उमेदवारी निश्चित करताना महाविकास आघाडीचे एकमेव उमेदवार म्हणून पाहिले गेलेल्या खोसकर यांची माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत झालेली बैठक हादेखील चर्चेचा विषय ठरला होता.

याचाच अर्थ खोसकर यांना महायुतीचे उमेदवार म्हणून देखील विचारात घेतले व तेवढाच प्रतिसाद खोसकर यांनी देखील दिला. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आपल्या विचाराच्या आमदारांचा अजित पवार यांनी उल्लेख करताना खोसकर यांचे नाव घेतल्याने खोसकर यांचा नेमका पक्ष कोणता यावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. पवार यांच्या भाषणातील उल्लेखासंदर्भात खोसकर यांच्याशी संपर्क साधला असता रात्री उशिरापर्यंत ते मिटींगमध्ये असल्याचे त्यांच्या स्वीय सहायकाकडून सांगण्यात आले.

Congress MLA Hiraman Khoskar
Nashik Lok Sabha Constituency : ‘भटकती आत्मा’, ‘नकली संतान’ ते ‘चोरांचे सरदार’व्हाया ‘टरबूज’! व्यक्तिगत टीका-टिपण्णीचा स्तर घसरला

१) सप्टेंबर महिन्यात आमदार खोसकर अजित पवार यांच्या व्यासपीठावर दिसले होते. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कानउघाडणी केल्यानंतर त्यांनी कॉंग्रेस पक्षाचाच असल्याची हमी देताना माझ्यावर जबाबदारी द्या, तुम्ही सांगाल ते काम पक्षाचे करेन असे आश्‍वासन दिले होते.

२) छगन भुजबळ यांच्या नावाची नाशिक लोकसभा मतदारसंघात चर्चा होती. त्यावेळी अजित पवार आमदार खोसकर यांच्या संपर्कात होते. खोसकर काय करायचे असा प्रश्‍न देखील पवार यांनी केल्याचे खोसकर यांनी बोलून दाखविले होते.

३) नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे काम करू नये असा माझ्यावर दबाव होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सतत फोन येत होते अशी कबुली खोसकर यांनी एका कार्यक्रमात दिली होती.

Congress MLA Hiraman Khoskar
Nashik Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीकडून स्ट्रॉग रूममध्ये प्रतिनिधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.