Nashik News : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता काँग्रेस मांडणार शासनदरबारी

Nashik News : राज्य शासनाचे लक्ष केंद्रित केल्यानंतर काँग्रेस पक्षही प्रत्यक्षपणे दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्याकरिता मैदानात उतरला आहे.
Congress party also to directly inspect drought situation (file photo)
Congress party also to directly inspect drought situation (file photo)Sakal
Updated on

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळावर राज्य शासनाचे लक्ष केंद्रित केल्यानंतर काँग्रेस पक्षही प्रत्यक्षपणे दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्याकरिता मैदानात उतरला आहे. त्यासाठी प्रदेश काँग्रेसकडून पाहणी समित्या करण्यात आल्या असून, उत्तर महाराष्ट्रासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात दुष्काळ पाहणी समितीचे अध्यक्ष आहेत. (Congress party also to directly inspect drought situation)

थोरात उत्तर महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता शासनदरबारी मांडणार आहेत. राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सूर्य तळपू लागला आहे. धरणांमधील साठवलेल्या पाण्याची वाफ होत असल्याने धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पिके करपली आहेत अन् पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर वाढत आहेत.

यातच चारा संकटही उभे राहण्याची शक्यता आहे. राज्यातील दुष्काळाची दाहकता शरद पवार यांनी राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर काँग्रेसनेही दुष्काळाकडे लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी पक्षाचे अनेक दिग्गज काँग्रेस नेते राज्यातील वेगवेगळ्या भागांत जाऊन दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उतरविले आहेत.

सोबतच सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहे, यावर नजर ठेवण्यासाठी काँग्रेसने विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती स्थापन केली आहे. यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मराठवाडा, विदर्भासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अमरावती विभागासाठी आमदार यशोमती ठाकूर, उत्तर महाराष्ट्रासाठी बाळासाहेब थोरात, कोकण विभागासाठी नसीम खान, पश्चिम महाराष्ट्रासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात दुष्काळ पाहणी समिती नियुक्त केल्या आहेत. (latest marathi news)

Congress party also to directly inspect drought situation (file photo)
Nashik Water Scarcity : जिल्ह्यात भीषण टंचाई! टॅंकरची संख्या 400, खर्च 63 कोटी

सदर समिती दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर या संदर्भात विभागीय आयुक्तांना निवेदनही देण्यात येणार असून, प्रदेश काँग्रेसला अहवाल सोपविणार आहेत. दरम्यान, समिती स्थापन झाली असून, थोरात यांच्याशी चर्चा झाली आहे. दोन दिवसांत तारीख निश्चित झाल्यानंतर जिल्ह्याचा दौरा होईल, असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिरीषकुमार कोतवाल यांनी सांगितले.

...अशी आहे समिती

समिती प्रमुख - बाळासाहेब थोरात

सदस्य - आमदार के. सी. पाडवी, कुणाल पाटील, शिरीष चौधरी, शिरीष नाईक, लहू कानडे, हिरामण खोसकर, शरद आहेर

Congress party also to directly inspect drought situation (file photo)
Nashik News : जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेत फूट! राजकारण तापले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.