Best Police Station : सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यात नाशिक परिक्षेत्र फेल!

police
policeesakal
Updated on

Best Police Station : स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत समाविष्ट असलेल्या नाशिक शहरासह परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यातील एकही पोलिस ठाणे शासनाच्या सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांच्या निकषांमध्ये बसू शकलेले नाही.

शासनाने जाहीर केलेल्या २०२१ मधील सर्वोत्कृष्ट पाच पोलिस ठाण्यांत शिवाजीनगर पोलिस ठाणे (कोल्हापूर), देगलूर पोलिस ठाणे (नांदेड), वाळूंज पोलिस ठाणे (छत्रपती संभाजीनगर शहर), अर्जुनी मोर पोलिस ठाणे (गोंदिया) आणि राबोडी पोलिस ठाणे (ठाणे शहर) यांचा समावेश आहे. (Nashik Constituency Fails in Best Police Station news)

पोलिस ठाण्यांमध्ये निकोप स्पर्धा वाढावी, तसेच कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, दोषसिध्दीत सुधारणा व्हावी यासाठी देशपातळीवर १० सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांची निवड करण्याबाबतचा निर्णय २०१६ मध्ये केंद्रीय स्तरावर घेण्यात आला होता. २०२० पासून राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट ५ पोलिस ठाण्यांची निवड करून पोलिस ठाण्यांना सन्मानचिन्ह व रोख बक्षिस प्रदान केले जाते.

या धर्तीवर २०२१ या वर्षातील कार्यमुल्यांकनाच्या बाबतीत राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे स्पर्धेकरिता निश्चित करून दिलेले गुणांकन निकष व नियमावली आदी बाबी विचारात घेऊन सर्व पोलिस ठाण्यांचे मूल्यमापन करण्यात आले.

यात २०२१ या वर्षातील कार्यमुल्यांकनाच्या बाबतीत परिक्षेत्रनिहाय व आयुक्तालयनिहाय प्राप्त उत्कृष्ट पोलिस ठाण्यांमधून सर्वोत्कृष्ट ५ पोलिस ठाण्यांची शिफारस राज्य स्तरावरील समितीने करत सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे- २०२१ म्हणून घोषित केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

police
Nashik Police Transfer : आयुक्तालय हद्दीतील सहायक निरीक्षकांच्या बदल्या; आयुक्त अंकुश शिंदे यांचे आदेश

गुणवत्ता वाढीचा मुख्य उद्देश

सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांच्या निवड प्रक्रियेत महाराष्ट्रातील पोलिस ठाण्यांचा समावेश देशपातळीवर व्हावा, या दृष्टीने व राज्यातील पोलिस ठाण्यांची कार्यक्षमता, कामगिरी वाढावी, गुणवत्ता वाढावी, मर्यादेत उत्कृष्ट पद्धतीने कामकाज व्हावे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हयाचा तपास आणि कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने संबंधित पोलिस अधिकारी, अंमलदार यांना प्रोत्साहित करणे आदी हेतू साध्य करण्यासाठी ही स्पर्धा घेतली जात असल्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी स्पष्ट केले आहे.

परिक्षेत्रात सुमारे दोनशे पोलिस ठाणे

नाशिक पोलिस आयुक्तालयात १४, नाशिक ग्रामीण पोलिस दलात ४० पोलिस ठाणे तर, परिक्षेत्रातील जळगाव, धुळे, नंदूरबार आणि अहमदनगर येथील सुमारे १५० पेक्षा जास्त पोलिस ठाणे आहेत. यातही नाशिक शहर स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत समाविष्ट असताना परिक्षेत्रातील एकाही पोलिस ठाण्याचा या पुरस्कारात समाविष्ट नसल्याचे आश्‍चर्य व्यक्त होते आहे.

police
Police Transfer: जिल्ह्यातील 11 पोलिस ठाण्यात खांदेपालट! अधीक्षकांच्या आदेशान्वये 16 निरीक्षकांच्या बदल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.