Nashik News : नाशिकच्या दूषित पाण्याने पक्षांचा अधिवास धोक्यात; नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या पाण्यात मृत मासे

Nashik News : नाशिक शहरातील वाढत्या दूषीत पाण्यामुळे नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील पक्ष्यांचे अधिवासावर परिणाम होणार आहे.
Dead fish found in Nandur Madhmeshwar dam area
Dead fish found in Nandur Madhmeshwar dam areaesakal
Updated on

निफाड : जागतिक दर्जाचे पाणथळ क्षेत्र असलेल्या नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभय आरण्य क्षेत्रातील नांदूरमधमेश्वर धरणाच्या मागील बाजुस कोठुरे, करंजगाव, चापडगाव, काथरगाव या भागात दूषित पाण्यामुळे शेकडो मासे मृत झाले आहे. नाशिक शहरातील वाढत्या दूषीत पाण्यामुळे नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील पक्ष्यांचे अधिवासावर परिणाम होणार आहे. (contaminated water endangered habitat of parties and fish)

निफाड तालुक्यातील गोदावरी आणि कादवा नदीवर नांदूर मधमेश्वर धरण आहे याच धरणावर ती नाशिक नगर आणि मराठवाडा या तीन जिल्ह्यातील प्रमुख शहरांना नांदूर मधमेश्वर डावा व उजवा कालवा तसेच मराठवाडा एक्सप्रेस कालवा यातून पाणी पुरवठा केला जातो तसेच या धरणाच्या पाण्यावरती नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यातील पक्षी आणि जलचर देखील अवलंबून आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रातील सांडपाणी थेट नदीपात्रात येत असल्याने गोदावरी प्रदूषित झाली आहे त्यामुळे निफाड तालुक्यातील जवळपास ३० ते ४० किलोमीटर नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पानवेलीची साम्राज्य पसरले आहे या पाने वेली मुळे नदीचे पाणी दूषित झाली आहे त्यामुळे नदीपात्रात असलेल्या जलचरांचे अस्तित्व देखील धोक्यात आले आहे.

अशातच आज नांदूर मधमेश्वर धरणात मोठ्या प्रमाणात मासेमवृत्त अवस्थेत आढळल्याने धरणातील पक्षांचे तसेच जलचरांचे अस्तित्व देखील धोक्यात आले आहे कारण देश विदेशातील स्थलांतरित पक्षी येथे डेरेदाखल होऊन जलचर वरती गुजराण करतात परंतु आता त्यांच्या देखील अधिवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (latest marathi news)

Dead fish found in Nandur Madhmeshwar dam area
Nashik Summer Heat : नाशिकचा पारा 41.8 अंशांवर; हंगामातील उच्चांकी कमाल तापमान, सूर्यकिरणे असह्य

"नांदुरमधमेश्वर धरणाच्या मागील बाजुस कोठुरे.करंजगाव.चापडगाव.काथरगाव या भागात गोदावरी.कादवा नदितील पाणवनस्पती.शेवाळ व नाशिकमधील सांडपाणी यामुळे अनेक मासे-जलचर मृत झाले असुन पाणी प्रदुषित होऊन पक्षी-वन्यजीव-निसर्ग-पर्यावरण यांना धोका निर्माण होऊन रोगराई पसरुन अनेक आजारांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे....जागतिक मान्यताप्राप्त "नांदुरमधमेश्वर पक्षीअभयारण्यातील पक्षी-जलचर-जैवविविधतेला हानी पोहचत असुन शासकिय यंञणेने त्वरीत दखल घ्यावी" - डॉ.उत्तमराव डेर्ले. पक्षीमित्र, अध्यक्ष- निसर्ग-पक्षी मिञ)

"गोदावरी नदी पात्रात असलेल्या पानवेली मुळे निफाड तालुक्यातील गोदाकाठच्या गावांचा पाणीपुरवठा योजनांचा श्वास कोंडला आहे याबाबत प्रशासनाला वेळोवेळी कळून देखील या प्रश्नांची सोडवणूक केली जात नाही निफाड तालुक्यातील करंजगाव आणि सायखेडा या परिसरात पानवेली मध्ये आख्खी नदीचा हरवून गेली आहे दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने मासे मृत झाल्याची घटना घडली आहे."- खंडू बोडके पाटील (माजी सरपंच करंजगाव)

Dead fish found in Nandur Madhmeshwar dam area
Nashik Burglary Crime : ओझरला घरफोडी! रोख रकमेसह सोन्याचांदीचे दागिने असा सव्वा दोन लाखांचा अैवज लंपास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.