नामपूर : राज्यातील जिल्हा परिषदांच्या २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेवर दोन शिक्षकांपैकी एका जागेवर निवृत्त शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने यापूर्वीच घेतला आहे. मात्र, निवृत्त शिक्षक न मिळाल्यास पद रिक्त राहून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.
त्यामुळे आता दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये डी.एड./बी.एड. पदविकाधारकांची १५ हजार रुपये मासिक मानधनावर कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती करण्याचा नवा निर्णय शासनाने आचारसंहितेपूर्वी घेतला. यातून शिक्षकांची पदे कमी होणार असल्याने शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. (Contractual Teacher for less than ten attendance)