नाशिक : महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा संदर्भातील तक्रारी आहेत. या संदर्भात भाजपच्या तीनही आमदारांनी महापालिका आयुक्तांना घेरले होते. बहुतेक राजकीय पक्षांनीही प्रशासनावर टीका केली आहे. त्या अनुषंगाने पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी महापालिकेने विभागीय अधिकारी व संबंधित अधिकारी यांच्याकडे तातडीने तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. (water Complaint appeal to departmental authorities)