Nashik Corona Update : शहरातून कोरोना हद्दपार झाल्याचा दावा! महापालिका हद्दीत केवळ 2 कोविड रुग्णांची नोंद

corona update
corona update esakal
Updated on

Nashik Corona Update : दोन वर्षे शहरात धुमाकूळ घालणाऱ्या कोविडने मागील दोन महिन्यात पुन्हा तोंड वर काढण्यास सुरवात केली. परंतु योग्य नियोजनामुळे जवळपास कोविड संपुष्टात आल्याचे दिसत आहे.

मागील ४८ तासात महापालिका हद्दीत दोन कोविडच्या रुग्णांची नोंद आढळून आली. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येऊन कोविड हद्दपार होत असल्याचे मानले जात आहे. (Nashik Corona Update Corona expelled from city Only 2 covid patients reported in NMC limits news)

२४ मार्च २०२० ला नाशिक शहरांमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर सातत्याने वाढ होत गेली. कोरोना पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात सर्वात भयानक टप्पा ठरला तो दुसरा.

पहिल्या टप्प्यात मृतांची संख्या अधिक असली तरी दुसऱ्या टप्प्यात मात्र ऑक्सिजनच्या कमतरतेने शहरातील आरोग्य व्यवस्थेचे लक्तरे बाहेर काढली. त्यानंतर शहरामध्ये चौथी कोरोनाची लाट आली. मात्र त्या लाटेचा प्रभाव दिसला नाही.

मागील दोन महिन्यापासून मुंबई पुणे व छत्रपती संभाजीनगर यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आली. नाशिक महापालिकादेखील सज्ज झाली.

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोविडचे बेड राखीव ठेवण्यात आले होते. आठ दिवसात जवळपास ५० रुग्ण आढळून आल्याने महापालिका हद्दीमध्येदेखील भीती निर्माण झाली. महापालिकेनेदेखील तातडीने केंद्र शासनाला पत्र लिहून लस मागविल्या.

कोविडची परिस्थिती पुन्हा भयानक होईल, असे चित्र दिसत असतानाच कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घटून नाशिक महापालिका हद्दीमधून कोरोना हद्दपार होत असल्याचा दावा केला जात आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

corona update
NMC Tax Concession : महापालिकेचा सवलतीचा फंडा फळाला! सवलत योजनेच्या कालावधीत 52 कोटीची वसुली

शहरातील स्थिती

- आतापर्यंत आढळून आलेले रुग्ण : दोन लाख ७६ हजार ४६२
- उपचाराअंती बरे झालेले रुग्ण : दोन लाख ७२ हजार ३४३
- कोविडमुळे झालेले मृत्यू : चार हजार १०९
- आजची कोविड रुग्णांची संख्या : १० (घरी उपचार)

लसीकरणाची स्थिती

- पहिला डोस- १४ लाख १३ हजार ५४१ (९३.४६ टक्के)
- दुसरा डोस- ११ लाख ५२ हजार ७६३ (७६.२१ टक्के)
- बूस्टर डोस- एक लाख ६६ हजार ८७४ (११.०३ टक्के)

"शहरातून कोविड हद्दपार होत असल्याची स्थिती आहे. सध्या दहा रुग्ण असले तरी त्यांच्यावर घरी उपचार सुरू आहे. शासनाकडून लस उपलब्ध होईल त्यानुसार लसीकरण केले जाईल."

- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिक्षक, महापालिका.

corona update
NMC Property Survey : मिळकतींची संख्या 5 लाखांच्या घरात; 41 हजार 295 मिळकती अनधिकृत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()