नाशिक : निर्बंध शिथिल होत असतांना सध्यातरी नाशिक जिल्ह्यातील परीस्थिती नियंत्रणात असल्याचे दैनंदिन आकडेवारीतून समोर येते आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात १७९ कोरोना बाधित आढळले असून, २१० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. चार बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात एक हजार ०८० बाधितांवर उपचार सुरु आहेत.
रविवारी (ता.१५) नाशिक महापालिका क्षेत्रात ३५, नाशिक ग्रामीणमध्ये ६३, मालेगावला एक तर जिल्हा बाहेरील तेरा असे एकूण ११२ कोरोना बाधित आढळले होते. तर १३५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यूची नोंद असून दोन्ही मृत नाशिक ग्रामीणमधील आहेत. सोमवारी (ता.१६) नाशिक महापालिका क्षेत्रात २९, नाशिक ग्रामीणमधील २५, मालेगावच्या एक, तर जिल्हा बाहेरील बारा असे एकूण ६७ कोरोना बाधित आढळून आले. तर दिवसभरात ७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. दोन बाधितांच्या मृत्यूची नोंद असून, यापैकी प्रत्येकी एक नाशिक शहर व नाशिक ग्रामीणमधील आहेत.
सायंकाळी उशीरापर्यंत ४७४ रुग्णांचे अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक ग्रामीणमधील १८१, नाशिक शहरातील १६४ तर मालेगावच्या १२९ रुग्णांना अहवालाची प्रतिक्षा होती. सोमवारी जिल्हाभरातील रुग्णालये व गृहविलगीकरणात ५२७ रुग्ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ५१३ रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयात तीन, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात पाच रुग्ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणला पाच तर मालेगावमध्ये एक संशयित रुग्ण दाखल झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.