Nashik News : खर्च 40 हजार अन्‌ उत्पन्न 10 हजार; राजापूरचे शेतकरी विठ्ठल वाघ यांनी कोथिंबरीवर फिरवला नांगर

Nashik : राजापूर येथील शेतकरी विठ्ठल वाघ यांनी दोन एकर कोथिंबीर पिकासाठी सुमारे ४० हजार रुपये खर्च आतापर्यंत केला.
Farmer plowing coriander.
Farmer plowing coriander.esakal
Updated on

Nashik News : राजापूर येथील शेतकरी विठ्ठल वाघ यांनी दोन एकर कोथिंबीर पिकासाठी सुमारे ४० हजार रुपये खर्च आतापर्यंत केला. मात्र, हातात दहा हजार रुपये उत्पन्न पडले. उरलेली एक एकरातील कोथिंबीर व्यापारी घ्यायला तयार नसल्याने त्यांनी कोथिंबीर नांगरली आहे. राजापूर येथे रिमझिम पाऊस येत असल्याने पिके चांगली असली, तरी काही भागात विहिरींना पाणी नसल्याने साठवून ठेवलेले पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. (Cost 40 thousand and income 10 thousand Rajapur farmer turned plow on Kothambari )

राजापूर येथे बराच शेतकऱ्यांनी मेच्या शेवटच्या आठवड्यात कोथिंबीरची लागवड केली होती. शेततळ्याच्या पाण्यावर लागवड केली, त्यांना मागील आठवड्यापूर्वी कोथिंबीरीने लखपती केले. मात्र, गेल्या चार दिवसांपासून कोथिंबिरीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. इतर गावांच्या तुलनेत येथे उशीरा पीक आले अन्‌ भाव घसरल्याने व व्यापारी त्या कोथिंबरला घ्यायला तयार नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. (latest marathi news)

Farmer plowing coriander.
Nashik News : ‘राजसारथी’ च्या टीडीआर व्यवहाराला न्यायालयाची स्थगिती; संचालकांच्या एका गटाकडून गैरव्यवहाराचा आरोप

एकरी कमीत दोन ते तीन हजार रुपयांप्रमाणे भाव मिळत असल्याने विठ्ठल वाघ यांनी कोथिंबीरमध्ये नांगर घातला आहे. त्यांनी दोन एकर कोथिंबीर लावली होती. त्यातील एक एकर कोथिंबीरला दहा हजार व्यापाऱ्याने मोठ्या मुश्कीलीने दिले. मात्र, इतर कोथिंबीर फुकट न्यायला तयार नव्हते, म्हणून त्यांनी रविवारी (ता. २८) नांगर फिरवला. यासाठी ४०० रुपये किलो बियाणे घेतले होते.

त्यानुसार एक एकरला १५ किलो, असे १२ हजाराचे बियाणे लागले. ५ ते ६ हजार लागवड करण्यासाठी मजुरी लागली. शिवाय लागवड, मशागत, निंदणी, औषध फवारणी, खते आणि १२ ते १५ हजारांचा खर्च झाला होता. सुमारे ३५ ते ४० हजारांचा खर्च झाला. मात्र, व्यापाऱ्याच्या विनवण्या करून हातात केवळ १० हजार रुपये मिळाले. यामुळे शेतकरी वाघ यांनी वैतागून कोथिंबीर नांगरली.

Farmer plowing coriander.
Nashik News : कळवण नगरपंचायतीच्या कार्पोरेट इमारतीचे 2 ला उद्घाटन; सर्वसोयींनीयुक्त अद्ययावत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.