Nashik News: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माफीवीर म्हटल्याप्रकरणी येथे दाखल खटल्याची सुनावणी आज झाली. त्यानंतर येथील न्यायालयाने गांधी यांना समन्स बजावले आहे.
येथील निर्भया फाऊंडेशनचे अध्यक्ष देवेंद भुतडा यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात २०२२ मध्ये अर्ज दाखल करीत राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याने अर्जदारांच्या भावना दुखावल्या, असा दावा दाखल केला होता.
या खटल्याची अतिरिक्त मुख्य सत्र न्यायधीश दीपाली कडुसकर यांच्या समोर सुनावणी झाली. २०२२ मध्ये हिंगोलीत झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. निर्भया फाऊंडेशनने या वक्तव्याविरोधात आक्षेप घेत अर्जाद्वारे न्यायालयात धाव घेतली होती.
यावेळी फाऊंडेशनच्या वतीने बाजू मांडताना ॲड. मनोज पिंगळे यांनी न्यायालयात सावरकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील संबंधांविषयीचे सबळ दाखले सादर केले. त्याआधारे न्यायालयाने सदरील दाव्यात तथ्य असल्याचे मान्य करीत तो दाखल करून घेतला. न्या. दीपाली कडूसकर यांनी राहुल गांधी यांना सीआरपीसी कलम २०४ व भादंवि ४९९ व ५०४ नुसार समन्स बजावले आहे.
राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याने भावना दुखावल्या गेल्याने निर्भया फाऊंडेशनतर्फे नाशिक जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन गांधी यांना समन्स बजावले आहे.
- ॲड. मनोज पिंगळे, याचिकाकर्त्यांचे वकील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.