Nashik News : अंत्यसंस्कारासाठी लाकडाऐवजी गोवऱ्या! शहर, परिसरात दिवसाला चौदा हजार गोवऱ्यांचा वापर

Latest Nashik News : नाशिक जिल्ह्यात तीन वर्षापासून अत्यंविधीसाठी गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्यांचा वापर वाढला आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जावा, वृक्षतोड थांबून झाडांचे संवर्धन व्हावे हा गोवऱ्या वापरण्याचा उद्देश.
cow dung govri
cow dung govriesakal
Updated on

मालेगाव : अनेक वर्षापासून अंत्यविधीसाठी लाकडाचा वापर होत आहे. पर्यावरणाचे संर्वधन व्हावे व वृक्षतोड थांबवावी यासाठी कसमादे जिल्ह्यात अत्यंविधीसाठी लाकडाऐवजी गोवऱ्यांचा वापर होवू लागला आहे. गायीच्या शेणापासून या गोवऱ्या तयार केल्या जात असल्याने नागरिकांकडून गोवऱ्यांचा वापरण्याची मागणी होत आहे. (Cow dung instead of wood for funeral)

नाशिक जिल्ह्यात तीन वर्षापासून अत्यंविधीसाठी गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्यांचा वापर वाढला आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जावा, वृक्षतोड थांबून झाडांचे संवर्धन व्हावे हा गोवऱ्या वापरण्याचा उद्देश. त्यामुळे आता मालेगाव शहर, परिसरासह तालुक्यातील अनेक भावांमध्ये अंत्यसंस्कारांसाठी गोवऱ्यांचा मागणी केली जात आहे. येथे शहर व परिसरात दिवसाला चौदा हजार गौरीचा वापर देखील नियमित होत आहे.

दीडशे महिलांना रोजगार

येथील अंत्यविधीसाठी गोवरी पुरविणारे व्यावसायिक जानेवारी ते मे पर्यंत या पाच महिन्यात सुमारे पंधरा लाख गौरी तयार करून ठेवले जातात. येथे पांजरपोळ व इतर गायींच्या गोठ्यामधून शेण गोळा करून गोवऱ्या तयार केल्या जात आहे. गोवरी बनविण्यापासून शहर व जिल्ह्यात सुमारे दीडशेपेक्षा अधिक महिलांना रोजगार मिळत आहे. पावसाळ्यात गौरी थापून वाळण्यासाठी सात ते आठ दिवस लागतात. तेच उन्हाळ्यात दोन दिवसात गौरी तयार होते. (latest marathi news)

cow dung govri
Nashik: सततच्या पावसाने छाटणीचे वेळापत्रक कोलमडले! ऑक्टोबरमध्ये द्राक्षबागांचा पोळा फुटणार; उशिरामुळे दरावर परिणाम होण्याची शक्यता

खर्चही कमी

शहरात आठ स्मशानभुमी आहेत. गोवऱ्यांवर अंत्यविधी करण्यासाठी सात हजार रुपये घेतले जातात. लाकडावर अंत्यविधी केल्यास दहा ते बारा हजार रुपये खर्च येतो.

"जिल्हाभरातून अंत्यसंस्कारासाठी गोवऱ्यांना मागणी वाढत आहे. गोवऱ्यांच्या वापरामुळे प्रदूषण कमी होते. तसेच पर्यावरणाची हानी देखील होत नाही. तसेच खर्चही कमी येतो."

- अनिल शिरसाठ, बाबा महाकाल अंत्यविधी सेवा, मालेगाव.

"गौ मातेला हिंदू धर्मात महत्वाचे स्थान आहे. लाकडाचा धुरापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. तेच गोवरींवर अंत्यविधी केल्याने प्रदूषणाचे घटते. गोवरींच्या वापरामुळे वृक्षतोड घटण्यास देखील मदत होत आहे. गोवरींवरील अंत्यसंस्कारामुळे रक्षाविर्सजन करणे सोपे जाते."

- नंदकुमार पाठक, अध्यक्ष ब्राम्हण सहाय्यक संघ कॅम्प, मालेगाव.

cow dung govri
Yeola MSRTC Depot: जुन्या बसमुळे लागली दृष्ट! 5 बस स्क्रॅपच्या वाटेवर, सर्व बसचे आयुर्मान झाले 10 वर्षांचे; नव्या बसची प्रतीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.